आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळकरी मुलाचा मृतदेह तलावात आढळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सातपूरच्या शिवाजीनगर येथील फाशीच्या डोंगराशेजारील तलावात एका शाळकरी मुलाचा मृतदेह रविवारी आढळला. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. गंगापूर पोलिसांनी या प्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना उघडकीस आली.

शिवाजीनगर परिसरात साती आसरा कॉलनीतील दर्शन घोडे (वय 12) हा शाळकरी मुलगा शनिवारपासून बेपत्ता होता. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह घरासमोरील तलावात आढळला. गंगापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच दर्शनच्या वडिलांचा परिसरात राहणार्‍या एका परप्रांतीय कुटुंबीयांशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. परिसरातील रहिवासी व नगरसेवकांच्या मध्यस्थीने हा वाद मिटलाही होता. मात्र, त्यातूनच ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु, पोलिसांनी प्रथमदर्शनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. सहायक आयुक्त गणेश शिंदे, निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह नगरसेवक पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली.