जळगाव : आई रागावल्याने रागाच्या भरात शाळेतून परस्पर निघून गेलेला आर.आर. शाळेचा विद्यार्थी सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास निमखेडी रेल्वे पुलाजवळ पोलिसांना सापडला. त्याला पालकांच्या ताब्यात दिले आहे. सात तासांनंतर मुलगा घरी परतल्याने त्याच्या आईवडिलांना आनंद झाला होता.
आव्हाणे शिवारातील सत्यम रेसिडेन्सी येथे राहणारा माेहित (नाव बदलेले, वय १३) हा विद्यार्थी आर.आर. विद्यालयातील अाठव्या इयत्तेत आहे. साेमवारी त्याने वडिलांच्या खिशातून सांगता पैसे काढले. पैसे काढत असताना त्याला आईने पाहिले. त्यामुळे त्याची आई चांगलीच रागावली. त्यांना कामावरच जायची घाई असल्याने त्याला सायंकाळी बघते असे म्हणत त्या निघून गेल्या.
त्यानंतर मोहित आणि त्याची जुळी बहीण रेणुका (नाव बदललेले) यांना शाळेत साेडले. परत दुपारी वाजता रोहित शाळेच्या मधल्या सुटीत गेटच्या बाहेर येऊन विसनजीनगरच्या रस्त्यात निघाले. त्याच वेळी त्याच्या अाईच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने त्याला बघितले. त्याने माेहितला पकडून पुन्हा शाळेत साेडले.
आई पुन्हा रागवेल या भीतीने ताे सायंकाळी शाळा सुटल्यावर शाळेच्या मागच्या गेटने गायब झाला. त्याची बहिण गेटजवळ त्याची वाट बघत उभी हाेती.
बराच वेळ झाला तरी मोहित आल्याने घाबरलेल्या आईने त्याच्या वडिलांना फोन केला. ते एका खासगी फायनान्स कंपनीत काम करतात. तीन तास शोध घेतल्यानंतरही मोहित सापडला नाही. त्यामुळे रात्री वाजेच्या सुमारास त्याच्या पालकांनी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात रोहित बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
मात्र, ताे अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तालुका पाेलिस ठाण्याचे कर्मचारी जितेंद्र पाटील हे निमखेडी परिसरात गस्त घालत हाेते. या वेळी तो त्यांना आढळून आला.
तू वाईट नसून केलेली चूक वाईट आहे
- पालक अाणि मुलांमध्ये चांगल्या पद्धतीचा संवाद असला पाहिजे. मुलांनी चूक केली. तर त्याला तू वाईट नसून, चूक करणे वाईट अाहे. तू अाम्हाला अावडताे. मात्र, चूक अावडत नाही. अशा भाषेत त्याला समजावून सांगणे गरजेचे अाहे. या वयात मुले चुका करतात. मात्र, त्याला चूक समजावून त्यांना शिस्त लावली पाहिजे. त्यांच्या मनात भीती उत्पन्न हाेईल असे करू नये. डाॅ.प्रदीप जाेशी, मानसोपचारतज्ज्ञ