आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकमध्ये पालकांची धावपळ; शालेय पाठय़पुस्तकांची अद्यापही प्रतीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- इयत्ता दुसरी, तिसरी, पाचवी व सातवीची पाठय़पुस्तके विविध बुक डेपोंमध्ये पालकांनी खेटे मारूनही मिळालेली नाहीत. तथापि, इयत्ता दुसरीचे मराठी, इंग्रजी, गणित या विषयांची पुस्तके बाजारात दाखल झाली आहेत. उर्वरित पुस्तके साधारण आठवडाभराने उपलब्ध होतील, असा अंदाज पुस्तक विक्रेत्यांनी वर्तवला आहे.

ज्या इयत्तांचा अभ्यासक्रम बदलला आहे, त्यानुसार नवीन पाठय़पुस्तके मिळणे जिकिरीचे होत आहे. दहावी व बारावीची पुस्तके आता कुठे बाजारात यायला सुरुवात झाली आहे. त्यातही बारावीचे पर्यावरण विषयाचे पुस्तक अजूनही उपलब्ध झालेले नाही, असे काही पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे इयत्ता दुसरी, तिसरी, पाचवी आणि सातवीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचाही घोळ सुरू आहे. दुसरीचे मराठी माध्यमाचे गणित हे पुस्तकही आले आहे. तसेच तिसरी, पाचवी व सातवीचीही काही पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे या पुस्तकांचा शोध पालक व विद्यार्थ्यांकडून सुरू आहे.

पुस्तकांच्या विक्रेत्यांकडे त्यासाठी सातत्याने विद्यार्थी व पालकांकडून विचारणा सुरू आहे. मात्र, इतर वर्गांची पुस्तके घेण्यासाठी पालकांची विक्रेत्यांकडे गर्दी होऊ लागली आहे.

प्रशिक्षणही झाले नाही : सुधारित अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली आणि दुसरी, तिसरी आणि सातवी या वर्गांना शिाकविणार्‍या शिक्षकांना मे महिन्यात प्रशिक्षण दिले जाणार होते. मात्र, नवीन अभ्यासक्रासाठीच्या प्रशिक्षण पुस्तिका न मिळाल्याने शिक्षकांना या प्रकारचे प्रशिक्षण देता आले नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावर पालकवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

पालक त्रस्त
शाळा उघडण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या हाती पाठय़पुस्तके पडायला हवी होती. मात्र, दोन महिने उलटूनही पुस्तके उपलब्ध होत नसल्याने पालकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
-दिनेश पवार, पुस्तक विक्रेता