आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान प्रदर्शनात बालवैज्ञानिकांचा आविष्कार; 250 विद्यालयांचा सहभाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मुलांमधील वैज्ञानिक जिज्ञासा, कल्पकता आणि नवनिर्मिती या गुणांना प्रोत्साहन मिळाल्यास भविष्यात चांगले संशोधक निर्माण होऊ शकतील. त्यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण होण्याची गरज आहे. विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमधील सुप्त आविष्कार सर्वांसमोर येण्यास मदत होत असते, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले.
तालुका विज्ञान अध्यापक संघ आणि पंचायत समिती (शिक्षण विभाग) यांच्या वतीने मखमलाबाद येथील र्शी छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 39 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे नीलिमा पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी पंचायत समिती सभापती अनिल ढिकले, शिक्षण विस्तार अधिकारी चित्रा देवरे, अशोक पिंगळे, नाना महाले, निवृत्ती महाले, पंढरी पिंगळे, रवींद्र परदेशी आदींसह मान्यवर उपस्थित होते. नीलिमा पवार पुढे म्हणाल्या की, आजच्या युगातील विद्यार्थ्यांवर प्रगत तंत्रज्ञानाचा पगडा आहे. आधुनिक साधनांचा वापर मुलांकडून होत आहे. परंतु, दुसरीकडे त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला, तर भविष्यात चांगले संशोधक निर्माण होतील. मात्र, त्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही पवार यांनी केले.