‘महावीर’च्या अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांची करामत
विदेशांतून आयात करण्यात येणार्या हायटेक क्नी मॅकेनिझमचे उत्पादन आता कमी किमतीत भारतातदेखील करणे शक्य होणार आहे. असा कृत्रिम पाय बनविण्यासाठी सर्वसाधारणपणे तीन लाख रुपये खर्च येतो; मात्र येथील र्शी महावीर तंत्रनिकेतनच्या अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी अवघ्या 30 हजार रुपयांत तो तयार केला आहे.
र्शी महावीर तंत्रनिकेतनच्या अभियांत्रिकी शाखेतील रोहित वालझाडे, गिरीश चव्हाण व मनीषकुमार चौधरी या विद्यार्थ्यांनी हा कृत्रिम पाय तयार केला आहे. कृत्रिम पाय तयार करण्यासाठी मान्यताप्राप्त जयपूर फूट हा मॅन्युअल ऑपरेटेड व लॉकिंग सिस्टिमवर आधारित आहे.
हायटेक क्नी मॅकेनिझममध्ये तो उपलब्ध होत नाही. युरोप वा अमेरिकेतून अडीच ते तीन लाख रुपये खचरून हायटेक क्नी मॅकेनिझमचे कृत्रिम पाय आयात करावे लागतात. त्यामुळे अनेकांना त्यापासून वंचित राहावे लागते. अशा व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. या विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे डॉ. सागर पाटोळे, डॉ. संदीप आवारे, डॉ. नीलेश कुंभारे, डॉ. चेतन कातकाडे आदींनी कौतुक केले आहे.