आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scottish English High School Building Collapse Issue At Nashik

स्‍कॉटिश इंग्लिश शाळेचा तिसरा मजला हटवला, ‘अतिक्रमण निर्मूलन’ची जेलरोडवर कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - जेलरोडवरील गुरुकुल वुमन्स एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट संचलित स्‍कॉटिश अकॅडमी हायस्कूल इमारतीच्या टेरेसवरील अनधिकृत मजला तळमजल्यावरील अनधिकृत कार्यालय शनिवारी (दि. १५) महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या पथकाने हटवला. स्थानिक रहिवाशांनी याबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पालिकेने ही कारवाई केली.

प्रभाग ३२ मधील नारायणबापूनगर चौकालगत दसक शिवारातील सर्व्हे नंबर ४९/१ वरील प्लाॅट नंबर १० ११ वरील या इमारतीस नगररचना विभागाने तळमजल्यावर पूर्ण पार्किंग त्यावरती पहिला आणि दुसरा मजला रहिवासी कारणासाठी पूर्णत्वाचा दाखला िदला होता. मिळकतधारक नालामारी रामी रेड्डी यांनी टेरेसवर तिसरा मजला तळमजल्यावरील पार्किंगच्या जागेत कार्यालयाचे पक्के बांधकाम शेडचे अनधिकृत बांधकाम करून रहिवासी वापराएेवजी शैक्षणिक वनिापरवाना वापर सुरू केला होता. अतिक्रमण निर्मूलन पथकाने तळमजल्यावरील अनधिकृत कार्यालयाचे बांधकाम ६० बाय ३० चे शेड जमीनदोस्त केले. पालिकेचे सहायक आयुक्त एस. टी. वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी किशोर चव्हाण यांच्यासह ५० कर्मचारी, पाच ट्रक, दोन गॅस कटर पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.

स्थानिकांकडूनतक्रारी : शाळेच्याहद्दीबाहेर साफसफाई धार्मिक सण साजरे करण्यास विरोध होतो, असे स्थानिक रहिवासी साक्षी बिरारी, शुभांगी साेनार, मनीषा गवळी भारती मोगल यांनी सांगितले.

कारवाई जबरदस्तीने
पालिकेच्याअतिक्रमण निर्मूलन पथकाने लेखी परवानगीशिवाय जबरदस्तीने शाळेचा तिसरा मजला उद‌्ध्वस्त केला. न्यायालयाची नाेटीस दाखवूनदेखील तोडफाेड करून शाळेचे नुकसान केले. रमादेवीरेड्डी, प्राचार्य,स्‍कॉटिश अकॅडमी हायस्कूल