आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंगार बाजार हटणार, प्रशासनाची तयारी पूर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सातपूर-अंबडलिंकराेडवरील अनधिकृत भंगार हटविण्यासाठी महापालिका पाेलिस प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, या मार्केटवर अाता काेणत्याही क्षणी बुलडाेझर फिरण्याची शक्यता अाहे. दरम्यान, हे मार्केट स्वत:हून काढून घेण्यासाठी दिलेल्या मुदतीत व्यावसायिकांनी अतिक्रमण काढल्यामुळे अतिक्रमण काढण्याचा खर्चही संबंधितांकडून वसूल केला जाणार अाहे. 
चुंचाळे शिवारातील भंगार बाजार हटविण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका पाेलिस प्रशासनाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू अाहे. महापालिकेचे अतिरिक्त अायुक्त किशाेर बाेर्डे यांच्या दालनात मार्केट हटविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठकदेखील झाली. त्याचप्रमाणे बंदाेबस्त देण्याकामी पाेलिस प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असून पाेलिस अायुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली काेठून काेठे कसा बंदाेबस्त लावायचा याबाबतची तयारी करण्यात अाली अाहे. शहरातील हा सर्वात मोठा भंगार बाजार असल्याने ताे हटविण्यासाठी अाठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी ही कारवाई शीघ्रतेने करण्याची याेजना पाेलिस महापालिका प्रशासनाच्या वतीने अाखली जात अाहे. यावेळी हाेणारे संभाव्य वाद लक्षात घेऊन त्या दृष्टीने पाेलिसांनी सर्व ताकदीनिशी तयारी केली अाहे. महापालिकेच्या वतीने ३१ डिसेंबर पर्यंत स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याबाबत व्यावसायिकांना मुदत दिली हाेती. तसेच याबाबतचे फलक देखील लावण्यात अाले हाेते. अंबड पोलिसांनीही भंगार व्यावसायिकांची बैठक घेऊन अतिक्रमण स्वतःहून काढण्याचे आवाहन केले हाेते. 

मात्र भंगार व्यावसायिकांनी अद्यापही अतिक्रमण काढलेले नाही. हे अतिक्रमण काढण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून माजी नगरसेवक दिलीप दातीर हे गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढाई लढत हाेते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत भंगार बाजार हटविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अतिक्रमण हटविण्याची ही शहरातील सर्वात मोठी ऐतिहासिक कारवाई ठरण्याची शक्यता आहे. यावेळी संभाव्य वादाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. मात्र याबाबत कमालीची गाेपनियता पाळली जात अाहे. 

अाता काेणत्याही क्षणी कारवाई 
भंगार बाजार हटविण्यासाठी पालिका पाेलिस प्रशासनाच्या वतीने जानेवारी ही तारीख निश्चित केेली अाहे. मात्र शहरात अायाेजित करण्यात अालेल्या महाअाराेग्य शिबिरामुळे पाेलिसांवरील बंदाेबस्ताचा ताण अाहे. त्यातूनही मार्ग काढत बंदाेबस्त पुरविण्याची तयारी सुरू असूून त्यामुळे काेणत्याही क्षणी ही कारवाई हाेण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली अाहे. 
बातम्या आणखी आहेत...