आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंगार बाजाराचे पुन्हा बस्तान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीपूर्वी अर्थात जानेवारी २०१७ राेजी शहरासाठी अत्यंत चर्चेचा विषय झालेल्या सातपूर-अंबड लिंकराेडवरील १७ वर्षांपासूनच्या अतिक्रमित भंगार बाजारावर पालिकेने बुलडाेझर फिरविला. महापालिका अायुक्त अभिषेक कृष्णा अाणि पाेलिस अायुक्त रवींद्र सिंगल यांनी यात पुढाकार घेतला. अधिकाऱ्यांच्या ताफ्यात अाणि पाेलिस बंदाेबस्तात येथील शेकडाे दुकाने टप्प्याटप्प्याने काढण्यात अाली. मात्र, अाता पुन्हा परिस्थिती जैसे थे हाेत अाहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे, काहीजणांच्या हितसंबंधामुळे बाजाराचे बस्तान पुन्हा बसत अाहे. हा सगळा कारभार बिनबाेभाट सुरू असताना अाता पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. या एकूणच दुर्लक्षित व्यवस्थेचे डी. बी. स्टारच्या माध्यमातून हे वास्तव चित्रण... 
 
{भंगार मार्केटचे अतिक्रमण पुन्हा हाेत अाहे. 
{भंगारमार्केटच्या अतिक्रमणाबाबत विभागीय अधिकाऱ्यांना सूचना करण्यात अालेल्या अाहेत. त्यांच्याकडून अहवाल अाल्यानंतर याेग्य ती कारवाई केली जाईल. केवल पार्कच्या परिसरात अतिक्रमण हाेत असल्याने नगररचना विभागाकडून त्यांना नाेटीस बजावण्याची कार्यवाही सुरू अाहे. 
 
{येथीलमाेबाइल व्हॅनचे काय? 
{अतिक्रमणहाेऊ नये यासाठी माेबाइल व्हॅन ठेवण्यात अालेली अाहे. ही व्हॅन भंगार मार्केट परिसरात फिरतही अाहे. मात्र अद्याप काेणावरही गुन्हा दाखल करण्यात अालेला नाही. 
{अतिक्रमणकेल्यानंतरचे साहित्य अद्यापही तिथेच पडून अाहे? 
{भंगार मार्केटचेसाहित्य काढून घेण्याबाबत व्यावसायीकांना सूचना देण्यात अाल्या अाहेत. ज्यांनी साहित्य काढलेले नाहीत त्यांना नाेटीस बजावण्याची कार्यवाही सुरू अाहे. 
 
 
नाशिकमहापालिकेचे अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी अत्यंत धाडसी निर्णय घेत पाेलिस अायुक्त डाॅ. रवींद्र सिंगल यांच्या मदतीने गेल्या १७ वर्षांपासूनच्या वादग्रस्त भंगार मार्केटवर अतिक्रमणाचा बुलडाेझर फिरविला. अत्यंत नियाेजनबद्धरित्या राबविलेल्या या माेहिमेसाठी लाखाे रुपयांचा खर्च झाला. अाता मात्र महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने याकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा भंगार व्यावसायिकांनी बस्तान बसविण्यास सुरुवात केली अाहे. पालिकेच्या गलथान कारभारामुळे न्यायालयाच्या अादेशाची पायमल्ली हाेत असल्याचे डी. बी. स्टारच्या पाहणीत पुढे अाले अाहे.
 
सातपूर-अंबड लिंकराेडवरील रहिवासी क्षेत्रात गेल्या १७ वर्षांपासून अनधिकृत भंगार मार्केट वसलेले हाेते. राजकीय वरदहस्त, व्यावसायिक अाणि अधिकाऱ्यांचे हितसंबंध यामुळे सुरुवातीस बाेटावर माेजण्याइतकी संख्या असलेल्या भंगार मार्केटमध्ये शेकडाे दुकाने झाली. अार्थिक संबंधांमुळे अतिक्रमण निर्मूलन पथकाने याकडे दुर्लक्ष केल्याने शहरातील सर्वात माेठे अतिक्रमित मार्केट म्हणून त्याची अाेळख निर्माण झाली हाेती. 

माेबाइलव्हॅनवर प्रश्नचिन्ह 
अतिक्रमणमाेहीम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर पुन्हा भंगार बाजार हाेऊ नये म्हणून या ठिकाणी माेबाइल व्हॅन ठेवली अाहे. मात्र, पुन्हा बहरत असणाऱ्या भंगार मार्केटमुळे माेबाइल व्हॅनच्या अस्तित्वाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले अाहे. 

सूक्ष्म नियाेजनाचा फायदा 
पाेलिस अायुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेनेही १२ पाेकलेन, २१ जेसीबी, १६ डम्पर, २४ ट्रॅक्टर अग्निशामक दलाच्या गाड्या अाणि ६०० पाेलिस कर्मचारी अशा ताफ्यात काढले हाेते भंगार मार्केटचे अतिक्रमण. 

शेकडाे वेळा लागली अाग 
या भंगार मार्केटमध्ये अाजतागायत शेकडाे वेळा अाग लागलेली अाहे. महापालिकेच्या अग्निशामक विभागातील जवानांनी जीवाची पर्वा करता अागीवर नियंत्रणही मिळविले अाहे. मात्र, भंगार व्यावसायिकांनी नियमाप्रमाणे कधीही पैसे भरलेले नाहीत. 

भंगार मार्केटमुळे गुन्हेगारीत झाली वाढ 
भंगारमार्केटचा माेठ्या स्वरूपात विस्तार झाल्याने हे मार्केट नकळत गुन्हेगारांचे अाश्रयस्थळ म्हणून उदयास अाले. या ठिकाणी विशिष्ट समाजाचे वर्चस्व तयार झाल्याने नेहमीच दाेन गटांत हाणामाऱ्या हाेण्याचे प्रकार वाढले. इतकेच नव्हे तर येथे अाश्रयास असलेल्या गुंडांकडून खुनासारखे गंभीर गुन्हेदेखील घडले अाहेत. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात नेहमीच भीतीचे वातावरण हाेते. अाता मार्केट काढल्यानंतरही पुन्हा ते वसवले जात असल्याने ही भीती कायम अाहे. 

सदस्यांनी मागितला खर्चाचा हिशेब 
भंगारमार्केटवर अातापर्यंत किती खर्च झाला. त्यांच्याकडून किती रुपयांची वसुली केली. हा खर्च कुठून भरून काढणार याबाबतची माहिती स्थायी समिती सदस्य भागवत अाराेटे यांनी प्रशासनाकडून मागविली अाहे. मात्र प्रशासनाने त्यांना अद्यापपर्यंत माहिती उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय अाराेटे यांनी व्यक्त केला असून, या संदर्भात स्थायी समितीच्या बैठकीत अांदाेलन करण्याचा इशारा त्यांनी दिला अाहे. 

अनेक वर्षे न्यायालयीन लढ्यानंतर यश 
भंगारमार्केट हटविण्यासाठी दिलीप दातीर यांनी लढा सुरू केला. प्रत्येकवेळी त्यांनी न्यायालयाकडून अतिक्रमण काढण्याचे अादेश मिळविल्यानंतर महापालिकेने तत्परतेने कारवाई केली नाही. पुढे भंगार मार्केटच्या व्यावसायिकांनी दातीर यांच्या निकालाला अाव्हान देत वेळाेवेळी न्यायालयाकडून मुदतवाढ मिळविली हाेती. याच काळात दातीर यांच्यावर अनेकदा हल्लेदेखील झाले हाेते. त्यानंतर अतिक्रमण निर्मूलन पथकाने मार्किंग हा पर्याय शाेधून विषय नजरेअाड केला जाऊ लागला. 

भंगार व्यावसायिकांचा माेर्चा अाता बेळगाव ढगा परिसराकडे 
सातपूर-अंबड लिंकराेडवरील अनधिकृत भंगार बाजार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जमीनदाेस्त केल्यानंतर त्यातील काही व्यापाऱ्यांनी त्र्यंबकराेडवरील बेळगाव ढगा या गावाच्या परिसरात दुकाने थाटण्याचा प्रयत्न केला अाहे. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास अाल्यानंतर त्यांनी या दुकानांना तीव्र विराेध केला अाहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने ज्या जागामालकांच्या जागेत दुकाने थाटण्याचा प्रयत्न केला अाहे त्यांना नाेटीसही बजावली अाहे. 
 
प्रचंड पाेलिसांच्या फाैजफाट्यात जमीनदाेस्त केलेल्या भंगार मार्केटचे अतिक्रमण अाजही अाहे त्याच स्थितीच पडून अाहे. इतकेच नव्हे तर काही व्यावसायिकांनी पुन्हा हळूहळू त्याच ठिकाणी पाय राेवण्यास सुरुवात केली अाहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच रस्त्यापर्यंत भंगार साहित्य मांडण्यात येत असल्याने एवढी माेठी माेहीम राबवून उपयाेग काय? असा प्रश्न नागरिकांना पडला अाहे. 
लाेकप्रतिनिधी, नागरिक म्हणतात... 
 

भंगार मार्केटचे प्रश्न कायम 
^महापालिकेने अतिक्रमण माेहीम राबविली असली तरीही भंगार मार्केटचे प्रश्न कायम अाहेत. भंगार मार्केटमधील मलबा अद्यापही हटविण्यात अालेला नाही. तसेच तसेच पुन्हा नव्याने मार्केट तयार हाेत अाहे. महापालिकेने वेळीच लक्ष देण्याची गरज अाहे. डाॅ.अमाेल वाजे, केवल पार्क 

लवकर परिसर स्वच्छ व्हावा 
^भंगारबाजार लवकरात लवकर महापालिका हद्दीबाहेर नेण्यात यावा. भंगार बाजाराचे अतिक्रमण काढल्यानंतरही ज्या व्यावसाहिकानंी पुन्हा अापली दुकाने येथे उभी केली त्यांच्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करण्याची गरज अाहे. हे अतिक्रमण काढून अाता जवळपास तीन महिने उलटून गेले तरी येथे मलबा तसाच पडून अाहे. त्यामुळे हा सगळा मलबा तत्काळ हटवून परिसर स्वच्छ करावा. अन्यथा पावसाळ्यात ताे अाराग्यास हानिकारक ठरेल. विनाेदघरटे, स्थानिक नागरिक 

नागरिकांसाठी विराेध कायमच 
^भंगारव्यावसायिकांनीज्या ठिकाणी व्यवसाय थाटले हाेते ते क्षेत्र १९९३ च्या विकास अाराखड्यात रहिवासी क्षेत्र अाहे. तसेच अाताच्या अाराखड्यातदेखील ते रहिवासी क्षेत्रच अाहे. हे मार्केट हटविण्यासाठी मी सर्वाेच्च न्यायालयापर्यंत लढलाे. भंगार व्यावसायिक महापालिका सर्वाेच्च न्यायालयापेक्षा माेठे नाहीत. अाता तर मी महापालिकेच्या सभागृहात अाहे. मी फक्त अायुक्त येण्याची प्रतीक्षा करीत अाहे. काेणत्याही परिस्थितीत भंगार मार्केट कायम हाेऊ देणार नाही. ते येथे नसणे हेच नागरिकांच्या हिताचे अाहे. दिलीपदातीर , नगरसेवक 

पूर्वानुभव वाईटच 
^भंगारभंगार मार्केटमध्ये नेहमीच अाग लागण्याच्या घटना घडल्या अाहेत. या मार्केटमध्ये भंगारचे साहित्य कारखान्यातील रासायनिक पदार्थांचे ड्रम, अाॅइल यांसारख्या ज्वलनशील वस्तूंमुळे क्षणार्धात अाग राैद्र रूप धारण करते. त्यामुळे केवल पार्क, संजीवनगर, जाधव संकुल या नागरी वसाहतींच्या परिसरातसुद्धा धाेका पाेहाेचण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रहिवाशांच्या अाराेग्याचा प्रश्नही माेठा असल्याने त्वरीत उपाययाेजना करण्याची गरज अाहे. रवीभारद्वाज, जिल्हाध्यक्ष, छावा संघटना 

अायुक्तांच्या अादेशालाही टाेपली 
^भंगार मार्केटचे अतिक्रमण काढण्यात येत असतानाच उच्च न्यायालयात जानेवारी २०१७ राेजी झालेल्या सुनावणीत भंगार मार्केटचे काढण्यात अालेले साहित्य महापालिका हद्दीबाहेर नेण्याचे स्पष्टपणे म्हटले अाहे. मात्र तसे झालेले नाही. उलट त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण हाेत अाहे. मी एप्रिल राेजी अायुक्तांच्या साेबत खास प्रभागाचा दाैरा करून त्यांना भंगार मार्केटची स्थिती दाखविली. त्यांनी माझ्यासमाेर उपायुक्तांना अादेश दिलेले अाहेत. मात्र, अायुक्तांच्या अादेशाचेच पालन हाेत नाही हे दुर्देव अाहे. भागवतअाराेटे, स्थायी समिती सदस्य 
अार. एम. बहिरम, 

अतिक्रमण उपायुक्त 
अतिक्रमण काढल्यानंतर अनेक वस्तू रस्त्यावरच येत हाेत्या. त्यानंतर महापालिकेने येथे प्रबाेधनात्मक फलक लावला. या फलकावर ‘व्यावसायिकांनी महापालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय काेणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये दुकाने थाटू नयेत; अन्यथा संबंधितांविरुद्ध पाेलिसांत फाैजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात अाला हाेता. मात्र, अज्ञात व्यक्तीने दुसऱ्याच दिवशी महापालिकेच्या वतीने लावण्यात अालेला फलक फाडून टाकला हाेता. 

 
 
बातम्या आणखी आहेत...