आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुलैअखेरीस पुन्हा हटणार भंगारबाजार, माेहिमेवेळी साहित्यही जप्त करण्याचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - चुंचाळे येथील भंगारबाजाराचे प्रचंड अतिक्रमण महापालिकेने काढल्यानंतर तेथे ८० टक्के व्यावसायिकांनी पुन्हा बस्तान मांडले असून, ही अतिक्रमित दुकाने पुन्हा एकदा जुलैअखेर काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला अाहे. माेहिमेवेळी साहित्यही जप्त करण्यात येणार अाहे. बंदाेबस्त पुरवण्यासंदर्भात पालिकेने पाेलिसांशी पत्रव्यवहार सुरू केला अाहे. 
सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिका प्रशासनाने प्रचंड पाेलिस बंदाेबस्तात ८०० अतिक्रमणे काढली हाेती. त्यासाठी पालिकेला तब्बल ८३ लाख रुपये खर्च अाला हाेता.
माेहिमेनंतर महापालिका प्रशासनाची पाठ वळताच भंगार व्यावसायिक पुन्हा अापल्या जागांकडे परतले अाहेत. त्यासंदर्भात अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात अाली हाेती. त्याची दखल घेऊन ही अतिक्रमणे पुन्हा एकदा काढण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. 
सातपूर-अंबड लिंकराेडवरील हा भंगार बाजार हटविण्यासाठी नगरसेवक दिलीप दातीर यांनी न्यायालयीन लढाई लढली हाेती. न्यायालयाने भंगार बाजाराचे अतिक्रमण काढण्याचे अादेश दिल्यानंतरही पालिकेच्या वतीने भंगारबाजाराचे अतिक्रमण काढले जात नव्हते. अखेर अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी पुढाकार घेतल्याने पाेलिस अायुक्त डॉ. सिंगल यांनी त्वरित पाेलिस बंदाेबस्त पुरविल्याने तीन दिवसांतच भंगार बाजार जमीनदाेस्त करण्यात आला होता. हे अतिक्रमण काढल्यानंतर चुंचाळे शिवारात राहणाऱ्या नागरिकांमधून समाधान व्यक्त होत होते. भंगार बाजारामुळे तेथील रहिवाशांच्या अाराेग्यालादेखील माेठा धाेका हाेता. या ठिकाणी अागीच्या घटना नेहमीच घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला हाेता. 

स्थायी बैठकीत मांडला हाेता विषय 
स्थायी समिती सदस्य भागवत अाराेटे यांनी स्थायीच्या बैठकीत हा विषय मांडून या प्रकाराला अतिक्रमण उपायुक्त राेहिदास बहिरम हेच जबाबदार असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली हाेती. त्यानुसार पालिका प्रशासनाने भंगारबाजारातील दुकाने हटविण्यासाठी सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...