आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंगार बाजारावर फिरणार शनिवारी बुलडाेझर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर - सातपूर-अंबडलिंकरोडवरील वादग्रस्त अनधिकृत भंगार बाजारावर येत्या शनिवारी (दि. ७) महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचा बुलडाेझर फिरणार अाहे. याबाबत प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून कायद्याचे पालन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा सातपूर पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश साेनवणे यांनी भंगार व्यावसायिकांच्या बैठकीत दिला. 
 
सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याचे अादेश उच्च न्यायालयाने दिले अाहेत. न्यायालयाच्या आदेशाची अंमजलबजावणी करण्यासाठी पालिका पाेलिस प्रशासन विभागातील बड्या अधिकाऱ्यांच्या अनेकवेळा बैठका झाल्या. तसेच भंगार व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे याबाबत पालिका प्रशासनाच्या वतीने अावाहन करण्यात अाले हाेते. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतही देण्यात अाली हाेती. मात्र, व्यावसायिकांनी पालिकेच्या अावाहनाला फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अंबड सातपूर पाेलिसांच्या वतीने भंगार व्यावसायिकांची बैठक अायाेजित केली हाेती. या बैठकीत व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे अाश्वासन दिले हाेते. तसेच अाम्ही व्यापार करणारेच असल्याने कायद्याचे पालन करणार असल्याची ग्वाही पाेलिसांना दिली. दरम्यान साेमवारी (दि. २) पाेलिस अायुक्तालयात अायुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली दीर्घकाळ झालेल्या बैठकीत अतिक्रमण काढण्याबाबत नियाेजन करण्यात अाले. दरम्यान, या माेहिमेत ७४६ छाेट्या माेठ्या भंगार व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्यात येणार अाहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी हे अतिक्रमण काढण्यासाठी सतत कायदेशीर लढा दिला अाहे. त्यामुळे न्यायालयाच्या अादेशामुळे हे अतिक्रमण काढण्यात येणार अाहे. दरम्यान, भंगार मार्केटचे अतिक्रमण काढण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्याने चुंचाळे शिवारातील नागरीकांमध्ये अानंदाचे वातावरण पसरले अाहे. 

नियाेजन सुरू 
^महापालिका पाेलिस प्रशासनाच्या वतीने सातपूर अंबड लिंकराेडवरील अतिक्रमण काढण्याबाबत याेग्य नियाेजन करण्यात अाले अाहेे. या परिसरातील सर्व अतिक्रमण जमीनदाेस्त करण्यात येणार असून बंदाेबस्ताच्या नियाेजनासाठी मी स्वत: रस्त्यावर उतरणार अाहे. -डाॅ. रवींद्र कुमार सिंघल, पाेलिस अायुक्त 
 
बातम्या आणखी आहेत...