आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंगार व्यावसायिकांचा पुन्हा बस्तान मांडण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गुन्हेगारांचे अाश्रयस्थळ म्हणून नावारूपास अालेला सातपूर-अंबड लिंकराेडवरील भंगार बाजार दीर्घकालीन न्यायालयीन लढ्यानंतर हटविण्यात अाला असला, तरी नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे भंगार बाजाराचे चित्र पालटत अाहे. अतिक्रमण माेहिमेनंतर जेमतेम दीड महिन्याचा कालावधी उलटत नाही ताेच पुन्हा भंगार व्यावसायिकांनी बस्तान बसविण्याचा प्रयत्न चालविला अाहे. याकडे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे दुर्लक्ष असल्याने महापालिकेच्या भूमिकेविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले अाहे. 
 
सातपूर-अंबड लिंकराेडवरील रहिवासी जागेत १७ वर्षांपूर्वी बाेटावर माेजण्याइतक्या व्यावसायिकांनी भंगारची दुकाने थाटली हाेती. मात्र, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले हाेते. त्यामुळे हळूहळू व्यावसायिकांची संख्या वाढत जाऊन सुमारे शंभर एकर जमिनीवर तब्बल ८०० भंगार व्यावसायिकांनी कब्जा करीत बाजार उभा केला हाेता. 

भंगार बाजारात येणाऱ्या वायर, केमिकल्सचे ड्रम, प्लास्टिक कचरा असे भंगार साहित्य तेथेच जाळले जाऊ लागल्याने नागरिकांच्या अाराेग्याचा प्रश्न निर्माण झाला हाेता. त्यामुळे भंगार मार्केटला नागरिकांकडून विराेध हाेऊ लागला. मात्र, मतांच्या लालसेपाेटी या प्रश्नाकडे राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले. अखेर नगरसेवक दिलीप दातीर यांनी हा प्रश्न उचलून धरत उच्च न्यायालयापासून सर्वाेच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. न्यायालयाकडून वेळाेवेळी भंगार मार्केट हटविण्याचे अादेश येऊनही प्रत्येकवेळी पालिका पाेलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे हा प्रश्न रेंगाळत राहिला हाेता. हे प्रकरण पुन्हा-पुन्हा न्यायप्रविष्ट हाेत हाेते. अखेरीस सिंहस्थानंतर लाभलेले मनपा अायुक्त अभिषेक कृष्णा पाेलिस अायुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल या दाेन्ही जिगरबाज अधिकाऱ्यांनी भंगार मार्केट हटविण्याचा निर्धार केला. यासाठी सूक्ष्म नियाेजन करीत त्याची अंमलबजावणीही केली हाेती. जानेवारीपासून अाठवडाभर ही माेहीम राबवून भंगार बाजार जमीनदाेस्त करण्यात यंत्रणा यशस्वी ठरली हाेती. मात्र, महापालिका निवडणुकांच्या कालावधीत प्रशासन व्यस्त झाल्याने भंगार व्यावसायिकांनी पुन्हा बस्तान बसविण्याचा प्रयत्न चालविला अाहे. उद‌्ध्वस्त केेलेल्या जागेवरच व्यावसायिकांनी पाल टाकून भंगार साहित्याने रस्ते व्यापले अाहेत. भंगार बाजारात फेरफटका मारला असता काही ठिकाणी शेड उभारण्यात येत अाहे, तर काही ठिकाणी बांधकाम सुरू अाहे. भंगार मालाची ने-अाण करणारी वाहने पूर्वीप्रमाणेच रस्त्याच्या कडेला उभी केली जात अाहे. 

न्यायालयाचा अवमान झाल्यास कारवाई 
^उच्चन्यायालयाने भंगार बाजार हटविल्यानंतर तेथे पडलेले साहित्य मनपा हद्दीबाहेर नेऊन टाकण्याचे अादेश दिलेलेे अाहेत. तसेच भंगार व्यावसायिकांनी तसे करण्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले अाहे. या अादेशाची अंमलबजावणी झाल्यास ताे न्यायालयाचा अवमान ठरेल. न्यायालयाने याची दखल घेतल्यास प्रसंगी यंत्रणेच्या प्रमुखांवर फाैजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. -केतन जाेशी, याचिकाकर्त्याचे वकील 

फाैजदारी गुन्हे दाखल करा 
^मनपाने हटविलेल्या भंगार बाजारातील साहित्य हे मनपा हद्दीबाहेर नेऊन टाकावे, असा अादेश उच्च न्यायालयाने दिलेला असतानाही हे साहित्य तेथेच पडून अाहे. याबाबत पालिका अायुक्तांशी चर्चा केली असता त्यांनी हाेळीनंतर याबाबत कार्यवाही करणार असल्याचे सांगितले. तसेच भंगार बाजार पुन्हा स्थापित हाेऊ नये अाणि असा प्रकार करणाऱ्यांवर पालिकेने फाैजदारी गुन्हा दाखल करावा. -दिलीप दातीर, नगरसेवक, शिवसेना 

 
बातम्या आणखी आहेत...