आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भंगार’ वाहनांच्या कारवाईला ब्रेकच; वाहतूक विभाग अन‌् पालिकाही सुस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देशातील १०० स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेल्या नाशिक शहरात वाहतुकीचा मात्र पुरता बोजवारा उडाला आहे. शहरातील द्वारका, सारडा सर्कल, शालिमार, मेनरोड, अशोकस्तंभ, सीबीएस आदी परिसरात रोजच वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असल्याचे चित्र बघावयास मिळते. अशा वेळी छोट्या-मोठ्या अपघातांच्या संख्याही वाढतच अाहे. वाहतूक कोंडीची ही वाढती समस्या लक्षात घेता, याबरोबरच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वर्दळीच्या प्रमुख मार्गांवर एकेरी वाहतुकीबाबत अधिसूचना काढण्यात अाली आहे. तसेच, या रस्त्यांवरील अनधिकृतपणे चारचाकी वाहनांवर टाेइंगची कारवाईही केली जाणार अाहे. तसेच, बेशिस्त वाहनचालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे मात्र शहरातील काही रस्त्यांवर कोणत्याही कारवाईची भीती बाळगता, सर्रासपणे नादुरुस्त, अपघातग्रस्त वाहने लावण्यात आलेली आहेत. या प्रकारामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होऊन रस्तेही मर्यादित झालेे आहेत. तसेच शहराच्या विद्रुपीकरणातही भर पडत आहे. विशेष म्हणजे, स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी देऊनही महापालिका प्रशासनासह वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत नसल्याने संताप व्यक्त केला जात अाहे. 
 
वाहने जप्त करावीत 
^रस्त्यालगत उभ्या असलेल्या नादुरुस्त वाहनांमुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे.वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या या वाहनांच्या मालकांचा शाेध घेऊन कारवाई करावी वा वाहनेच जप्त करावीत. -गौरव पगारे, मॉर्डन फाउंडेशन 

गॅरेजचालकांवरही कारवाई हाेणे अपेक्षित 
^अनेक गॅरेज चालक रस्त्यावरच वाहने दुरुस्त करतात किंवा वाहने उभी करून ठेवतात. यामुळे बऱ्याचदा अपघातही हाेतात. अशा गॅरेजचालकांविरोधात कारवाई व्हावी. -राकेश पोमनार, स्थानिक रहिवासी 

या भागात रस्त्यावर उभी करण्यात आली आहेत वाहने... 
{वडाळानाका परिसर 
{मुंबई नाका परिसर 
{पाथर्डी फाटा 
{द्वारका 
{महामार्गावरील समांतर रस्ते 
{उपनगर परिसर 

शहरातील वडाळा नाका, सारडा सर्कल, जुने नाशिक परिसरातील रस्त्यालगत गॅरेजचालकांनी आपले बस्तान मांडले आहे. या गॅरेजचालकांकडून थेट रस्त्यावरच नादुरुस्त वाहने उभी केली जातात. या प्रकारामुळे पादचाऱ्यंाना, अन्य वाहनधारकांना मात्र मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते. या ठिकाणी खासगी शिकवण्या, शाळाही असल्याने विद्यार्थ्यांच्याही सुरक्षिततेचाही प्रश्न अाहेच. 

गॅरेजमालकांवरही कारवाईचा बडगा उगारण्याची गरज 
नक्की वाहने कोणाची, याचा शोध घेणे महत्त्वाचे 
शहरातीलकाही विशिष्ट रस्त्यांवर गेल्या कित्येक दिवसांपासून नादुरुस्त, अपघातग्रस्त, भंगार वाहने धूळखात पडून आहेत. वाहतुकीला अडचण ठरणाऱ्या या वाहनांचे मालक काेण, याचा प्रशासनाने शाेध घेणे गरजेचे अाहे. कोणाचीही मालकी नसलेली वाहने जप्त करून संबंधित रस्ता मोकळा करायला हवा. वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने सर्वेक्षण करून संबंधित रस्त्यांना माेकळी वाट करून देणे गरजेचे अाहे. 

प्रचंड अस्वच्छता, तरीही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्षच 
‘सुंदर नाशिक, स्वच्छ नाशिक’ या संकल्पनेलाच या प्रकारामुळे छेद बसत आहे. शहर स्वच्छतेसाठी पालिका प्रशासन प्रयत्न करीत असताना अशा भंगार वाहनांमुळे अस्वच्छतेत भर पडत अाहे, त्याकडे मात्र दुर्लक्षच हाेत अाहे. गेल्या कित्येक दिवसांपासून उभ्या असणाऱ्या या वाहनांच्या भोवती मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला असल्याने दुर्गंधी पसरून आरोग्य धोक्यात आले आहे. 

शहरातील मुंबई नाका ते सारडा सर्कल दरम्यानच्या रस्त्यावरील भंगार वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न अाजही कायम अाहे. इतर काही रस्त्यांवरही हेच चित्र अाहे. 

कोल्हापूर पॅटर्न राबविण्याची गरज 
वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बेवारस, भंगार वाहनांविरोधात कोल्हापूरमध्ये महापालिका वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवत सर्वेक्षण केले. यात आढळलेली बेवारस वाहने जप्त करण्यात आली अाहेत. ज्या वाहनांचे मालक सापडले त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नाशकातही वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी स्वच्छतेसाठी ‘कोल्हापूर पॅटर्न’ राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. 
 
जयंत बजबळे, सहायकपोलिस आयुक्त, वाहतूक विभाग 
शहरात अनेक ठिकाणी वर्दळीच्या रस्त्यांवरच नादुरुस्त वाहनांची पार्किंग ठरतेय डाेकेदुखी; मालकांचा शाेध घेण्यात प्रशासनाकडून दिरंगाई 
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असताना त्यात भंगार, नादुरुस्त वाहनांच्या पार्किंगमुळे अाणखीनच भर पडत असल्याचे ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाले अाहे. एकीकडे वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी एकेरी मार्ग अन‌् टोइंगचा पर्याय अवलंबला जात असताना अनेक रस्त्यांवर वर्षानुवर्षे धूळखात पडून असलेल्या या बेवारस वाहनांविरोधात कारवाई हाेत नसल्याने अाश्चर्य व्यक्त हाेत अाहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या या वाहनांमुळे परिसराच्या व्रिदुपीकरणात भर पडून अाराेग्याचा प्रश्नही गंभीर बनला अाहे. मात्र, वाहतूक पाेलिस महापालिका सुस्तच असल्याने हा प्रश्न अद्यापही कायम अाहे. 
 
..अशा वाहनांवर नियमित कारवाई करताे 
{रस्त्यावरील भंगार, नादुरुस्त वाहने वाहतुकीला अडचण ठरत असतानाही कारवाई का हाेत नाही? 
-वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांविरोधात वाहतूक पोलिसांकडून नियमित कारवाई केली जाते. 
{ काहीगॅरेजचालक थेट रस्त्यावरच वाहने दुरुस्ती करतात किंवा रस्त्याच्या कडेलाच कित्येक दिवस वाहने उभी करतात, त्यांच्यावर कारवाई का हाेत नाही? 
-अशा गॅरेज चालकांविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परत अशी स्थिती आढळल्यास कारवाई करू. 
{ अशा‘भंगार’ वाहनांमुळे अपघातही वाढत अाहेत अन‌् अस्वच्छताही, त्याचे काय? 
-तक्रार प्राप्त झाल्यात तातडीने मोहीम राबवून संबंधितांवर कारवाई करू. 
बातम्या आणखी आहेत...