आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Script Sensor Process Going Online Arun Nalawade

संहिता सेन्साॅर प्रक्रिया अाॅनलाइन - अरुण नलावडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाट्य लेखकांना अापली संहिता सेन्साॅर करण्यात येणाऱ्या अडचणींवर ताेडगा म्हणून अाता संपूर्ण सेन्साॅर प्रक्रिया अाॅनलाइन करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती रंगभूमी प्रयाेग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी दिली.

मंडळावर नवीन पदाधिकारी अाल्यानंतर एकूणच संहिता सेन्साॅर प्रक्रियेत माेठा बदल करण्यात येत अाहे. रंगकर्मी, लेखकांना नक्की काय बदल अपेक्षित अाहेत अाणि लेखकांना वा संस्थांना सेन्साॅर केलेल्या संहिता तत्काळ कशी मिळतील, यासाठी सर्वच पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न सुरू अाहे. त्याबाबत बुधवारी (ता. २) मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये रंगकर्मी लेखकांशी संवाद साधला.

मंडळाचे सदस्य अशाेक समेळ ‘दिव्य मराठी’शी बाेलताना म्हणाले की, पूर्वी पाेस्टाने वा हाताेहात संहिता सेन्साॅर बाेर्डापर्यंत पाेहाेचवावी लागत असे. सध्याही हीच पद्धत सुरू अाहे. पण, लवकरच ही संपूर्ण प्रक्रिया अाॅनलाईन हाेणार अाहे. यासाठी एका वेबसाइटचीही निर्मिती करण्यात अाली अाहे. या वेबसाईटवर लेखकांनी अापल्या संहिता अपलाेड करायच्या अाहेत. एवढेच नव्हे, तर सेन्साॅरसाठीचे शुल्कही अाॅनलाइन अदा करायचे अाहे. त्यानंतर त्याची पावतीही लेखकांना अाॅनलाइनच मिळणार अाहे. लेखकांनी अापल्या संहिता वेबसाइटवर अपलाेड केल्यानंतर त्या सदस्यांपर्यंत पाेहाेचतील. त्यांनी वाचल्यानंतर सेन्साॅर म्हणून ते अापला अभिप्राय पुढे देतील. त्यानंतर अध्यक्षांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्रही लेखकांना अाॅनलाइनच उपलब्ध हाेणार असल्याने माेठा कष्ट अाणि कालावधी वाचणार अाहे.
यावेळी प्रसाद कांबळी, मनाेहर जाेशी, मानसी मागीकर, विवेक अापटे, गिरीश भूतकर, पुरुषाेत्तम लेले, स्मिता भाेगले, प्रतिभा तेटू-नागपुरे, पा. तु. पाटणकर, गिरीश दाबके, प्रवीण कुलकर्णी, चंद्रकांत शिंदे अादी उपस्थित हाेते. सावानाच्या मु. शं. अाैरंगाबादकर सभागृहात अनाैपचारिक संवाद झाला.

नाट्य परिषदेचा पुढाकार
अापल्यासंहिता सेन्साॅर करायच्या असलेल्या शहरातील लेखकांसाठी नाट्य परिषद पुढाकार घेणार अाहे. याबाबत अडचण असल्यास नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांच्याशी संपर्क साधण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे. तसेच, नाशिकमध्ये परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य सुरेश गायधनी अाणि विवेक गरुड यांच्याकडून लेखकांनी अापल्या शंकांचे निरसन करून घ्यावे, असे अावाहन करण्यात अाले अाहे.

रंगकर्मी अाणि परिनिरीक्षण मंडळ सदस्यांतील संवाद
*सर्टिफिकेट मिळायला सहा महिने लागतात...
-अजिबातच नाही. अाम्ही साधारणत एक महिन्याच्या अात ते देण्याचा प्रयत्न करताे.
*‘स्थानिक’ला प्रयाेगांची परवानगी मिळावी...
-सेन्साॅर बाेर्डाचा उपयाेगच काय? संहिता दाेन किंवा अधिक सदस्यांनी वाचावी लागते. त्यांना काही अाक्षेप अाढळले तर इतरांनाही वाचायला दिली जाते. अशी त्याची प्रक्रिया अाहे. त्यामुळे पाच प्रयाेगांसाठी परवानगी नाही मिळू शकत.
*स्पर्धांमध्ये फक्त पावत्या दाखवल्या जातात...
-मुळातच राज्य नाट्य स्पर्धेत परवानगीचा प्रश्नच नसताे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडेच प्रती गेलेल्या असतात अाणि एका प्रयाेगासाठी ती परवानगी गृहीत धरली जाते. असा ठरावच केलेला असताे.
*लाेकनाट्य, वगनाट्यांच्याही संहिता असतात का?
-हाेय, सर्व प्रकारच्या नाटकांच्या संहिता सेन्साॅरसाठी येतात. त्या सगळ्या वाचून जास्तीत जास्त संहितांना परवानगी दिलीच जाते.
*संहिता देणे, पैसे भरणे हे काम त्या-त्या गावच्या सदस्यांनाच दिले तर...
-असे केले तर सेन्साॅरची काही गरजच उरणार नाही. अापल्याला सेन्साॅरचे कार्यालय दिले अाहे. मग त्याचा काहीच उपयाेग हाेणार नाही अाणि संहिता एका ठिकाणी जमाही हाेणार नाहीत.