आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खत प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय कंत्राटदाराचा शोध सुरू, पालिका आयुक्तांची तीन कंपन्यांबरोबर प्राथमिक चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- 60- काेटी रुपये खर्चून पाथर्डी शिवारात सुरू केलेला खत प्रकल्प चालवण्यासाठी अाता महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनीच पुढाकार घेतला असून, त्यांनी खत प्रकल्प चालवण्याचा अनुभव असलेल्या तीन अांतरराष्ट्रीय कंपन्यांसाेबत प्राथमिक चर्चाही केली अाहे. यात तिन्ही कंपन्यांनी प्रकल्पाचे कामकाज चालवण्याची तयारी दाखवली असून, स्थानिक मनुष्यबळाच्या सक्तीची अट वगळण्याची मागणीही केली अाहे.
महापालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या या खत प्रकल्पात त्र्यंबकेश्वर येथील कचरा अाणण्याच्या विषयावरून महासभेत गदाराेळ झाला हाेता. स्वपक्षीय नगरसेवकांचा विराेध डावलून मनसेने कचरा स्वीकारला. मात्र, दुसरीकडे ते करताना खत प्रकल्प सुरू करण्याच्या अाश्वासनाकडे पाठ फिरवली. त्यानंतर शिवसेनेने तीन महिन्यांचा अल्टीमेटम देत खत प्रकल्प सुरू केल्यास अांदाेलनाचा इशारा िदला हाेता. या पार्श्वभूमीवर महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी बुधवारी दुपारी खत प्रकल्पाला भेट िदली. या प्रकल्पातील कामकाज पूर्णपणे ठप्प झाल्याची वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी माध्यमांशी बाेलताना कबूल केले. हा प्रकल्प पालिकेमार्फत सुरू हाेणे अशक्य असल्याचे सांगत त्यासाठी १८० लाेकांची गरज असताना अाजघडीला फक्त ५८ कर्मचारीच काम करीत अाहेत. नवीन भरतीवर निर्बंध असल्यामुळे खासगीकरणाशिवाय प्रकल्प चालवणे मुश्कील असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या पार्श्वभूमीवर कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचा अनुभव असलेल्या तीन कंपन्यांशी अायुक्तांनी चर्चा केल्याचे सांगितले. निविदा प्रक्रियेद्वारेच कंपन्यांना काम िदले जाईल, असे सांगून त्यांनी प्रकल्पाचे काम करताना स्थानिक पातळीवरील कुशल मनुष्यबळाचा वापर केला जाईल असे सांगितले, फक्त भरती प्रक्रियेत स्थानिकांचा हस्तक्षेप नकाे, अशी अट घातल्याचे सांगण्यात अाले.