आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका मिस कॉलवरून लागला घरातून निघून गेलेल्या दोन बहिणींचा शोध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वडील रागवल्याने घरातून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचा एका मिस कॉलवरून शोध लावण्यात पंचवटी पोलिसांना यश आले आहे. दोन मुली बेपत्ता झाल्याने पोलिस यंत्रणेकडून गांभीर्याने तपास करुन या मुलींना शिर्डी येथून ताब्यात घेत त्यांना पोलिस अधिकाऱ्यांनी वडिलकीचा सल्ला देत रविवारी (दि. १९) त्यांच्या कुटुंबियांकडे सुखरूपपणे परत पाठवत खाकीने माणुसकीचे दर्शन घडवले. 


पंचवटी परिसरातून सोळा आणि चौदा वर्षाच्या दाने मुली बेपत्ता झाल्याची तक्रार गुरुवारी (दि. १६) पंचवटी पोलिसात देण्यात अाली हाेती. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी ही बाब गांभीर्याने घेत सखोल तपास सुरु केला. या मुलींच्या फाेटा व्यतिरिक्त पोलिसांकडे काहीच माहिती नसल्याने तपासात अडचणी अाल्या. तपासात नात्यातील एका मुलाच्या मोबाइलवर एक अनोळखी नंबरवरून मिस कॉल आला असल्याची माहिती मिळाली. 


एका नातेवाईकाने त्या नंबरवर संपर्क साधला परंतु यानंतर हा नंबर बंद झाला. मात्र पोलिसांनी या नंबरची तंत्रविश्लेषण शाखेच्या मदतीने शाेध घेतला असता शिर्डी परिसरातील हा नंबर असल्याची माहिती मिळाली. पथकाने दोन दिवस शिडीमध्ये हॉटेल, लॉज, खानावळ, परिसरातील वस्तीत तपास केला, मात्र हाती काही लागले नाही. अखेर पथकाने शिर्डी देवस्थानाबाहेर व्यावसायिकांकडे विचारपूस केली असता. दोन मुली संस्थानमध्ये १० रुपये रोज देत राहत असल्याची माहिती त्याने दिली. पथकाने दोघींना ताब्यात घेत त्यांची अास्थेवाईकपणे विचारपूस केली. दोघींनी वडील रागवल्याने घर सोडल्याचे सांगितले. मोठ्या बहिणीने लहानीला सोबत घेत येथे नोकरी करत तिचे शिक्षण करणार असल्याचे सांगितले. तेव्हा पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना गहीवरुन आले. वडिलकीचा सल्ला दिल्यानंतर दोघींना सोबत घेत पथक सकाळी नाशिकला रवाना झाले. सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, सतीश वसावे, डी. बी. निंबाळकर, जितेश जाधव, शीतल शिंदे, तनुजा शिंदे यांच्या पथकाने या मुलींचा शोध घेत त्यांना सुखरुपरीत्या पालकांच्या ताब्यात दिले. 


दुहेरी तपासात मिळाली अपहृत मुलगी 
सरकारवाडापोलिसांचे पथक भोंदूबाबाच्या मुळगाव जोहनपूर येथे तपास करत असताना नाशिक येथील एका मुलीला येथे पळवून आणले असल्याची माहिती मिळाली. पथकाने जोहनपूर परिसरात सापळा रचला एका घरातून या अपहृत मुलीची सुटका केली. नाशिकचा राहणारा अक्षय चौधरी जोहनपूर येथील त्याच्या मित्राला पथकाने ताब्यात घेतले आहे. सुदैवाने पथक वेळीच पोहचले, नाही तर दोघे दिल्ली येथे जाणार होते. असे झाले असते तर त्यांना शोधण्याचे पोलिसांसाठी मोठे आव्हान निर्माण झाले असते. पंकज पळशीकर, रवींद्र पानसरे, सुनिल जगदाळे, दीपक खरपडे, पंकज महाले यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

बातम्या आणखी आहेत...