आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आखाड्यांना जुलैपासून जागावाटप, जिल्हाधिकारी कार्यालयात साधू-महंत प्रशासनाची बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अवघ्या११ दिवसांवर येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्याची जवळपास सर्वच कामे पूर्णत्वास गेली आहेत. आखाड्यांना जागावाटपाची प्रक्रियाही सुरू झाली असून, त्यासाठी सोमवारी (दि. ६) साधू-महंत प्रशासनाची एकत्रित बैठकही आयोजित करण्यात आली आहे.

सिंहस्थात येणाऱ्या साधू-महंतांसाठी तपोवनात साधुग्रामची उभारणी करण्यात आली आहे. त्याचे सेक्टरनुसार नियोजनही करण्यात आले आहे. परंतु, केवळ कुठल्या आखाड्यांना कुठल्या सेक्टरमध्ये कुठले आणि किती प्लॉट हवे आहेत, याची अद्याप प्रशासनाकडे कुठलीही सखोल माहिती नाही. कुठल्या आखाड्याचे किती संत-महंत अर्थात, सदस्य येणार याची कल्पना नसल्याने त्याची विभागणी अद्याप झाली नाही. परंतु, आता १४ जुलै रोजी पुरोहित संघाचे ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात आखाड्यांचे ध्वजारोहण होईल. तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने सिंहस्थास सुरुवात होईल. त्यामुळे सारीच लगबग सुरू होणार असल्याने आणि ११ दिवसांवरच हा उत्सव आल्याने शहरात साधू-महंतही येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्यांना राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या साधुग्राममधील प्लॉटचे वितरणही करण्याची मागणी स्थानिक साधू-महंतांकडून झाली. त्यावर जुलै रोजी नियोजन भवन येथे बैठक होणार असून, त्याची पाहणीही स्थानिक साधू-महंतांनी गुरुवारी केली.