आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेलरोड रस्त्यावर तीन दिवसांत दुसरा अपघात, दुचाकीस्वार ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - जेलरोड रस्त्यावरील इंगळेनगर चौकात झालेल्या अपघातात कारागृह रक्षकाच्या रक्ताचे डाग कायम असतानाच, शुक्रवारी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास भीमनगर चौकात अपघात होऊन तीन दिवसांत दुसरा बळी गेला. जेवणाच्या सुटीत घरी जाताना एअरफोर्सच्या ट्रकच्या धडकेत प्रेस कामगार कैलास तुकाराम सावंत यांचा जागीच मृत्यू झाला.

करन्सी नोट प्रेसच्या नेहरूनगर प्रवेशद्वारातून बाहेर पडून भीमनगर चौकातून बिटकोकडे वळताना बिटकोकडून आलेल्या एअरफोर्सच्या ट्रकने (१४ डी, १९३६३९ एम) कैलास तुकाराम सावंत (५१, रा. जिजामातानगर, हरिवंदन सोसायटी, जेलराेड) यांच्या दुचाकीला (एमएच १५, सीएन ६७७१) धडक दिली. यात सावंत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन दिवसांपूर्वी कारागृह रक्षक मदनलाल मोरे यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला होता. शिवसेनेने जेलरोड रस्त्यावरील शाळेसमोर दोन दिवसांपूर्वी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर इंगळेनगर चौकात दोन्ही बाजूने गतिरोधक टाकण्यात आले, मात्र वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली नाही. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे सहा महिन्यांत झालेल्या अपघातात सातवा बळी गेला आहे.
‘शिवराज्य’चे पोलिस आयुक्तांना निवेदन
जेलरोड रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करून सिग्नल बसवावा, या मागणीचे निवेदन शिवराज्य पक्षातर्फे पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांना जिल्हाप्रमुख संजय ढिकले, योगेश टर्ले आदींनी दिले.
प्रेस मजदूर संघाची गतिरोधकाची मागणी
सीएनपी प्रेसचे तीन हजार कामगार २० शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची जेलरोड रस्त्यावर वर्दळ असते. त्यामुळे प्रेससमोर दोन्ही बाजूने गतिरोधक टाकण्याची मागणी आयएसपी मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गाेडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...