आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या दिवशीही एटीएम बंदच; बँकांच्या मुख्यालयांतील एटीएमवर गर्दी, ग्राहकांची अपेक्षा फाेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी शहराच्या विविध भागातील एटीएम बंद हाेते. - Divya Marathi
गुरुवारी शहराच्या विविध भागातील एटीएम बंद हाेते.
नाशिक- राेखरकमेअभावी शहरातील बहुतांश एटीएम बंद पडले आहेत. बुधवारी बुद्ध पाैर्णिमेची शासकीय सुटी असल्याने गुरुवारी एटीएम ‘कॅशफुल’ होण्याची ग्राहकांची अपेक्षा फोल ठरली. शोध घेऊनही पैसे असलेले एटीएम मिळतच नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होत आहे. दरम्यान, सोमवारनंतर परिस्थिती सुधारण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. नोटबंदीनंतर हतबल झालेल्या शासकीय, निमशासकीय, सहकारी आणि खासगी बँकांची सहा महिन्यांनंतरचीही स्थिती वाईटच आहे. बँक ऑफ बडोदाचे शरणपूर परिसरातील जुने पोलिस आयुक्तालयाच्या समोरील आणि रेडक्रॉस सिग्नलसह शहरातील जवळपास सर्वच एटीएम बंद असल्याचे आढळून आले. अायसीआयसी बँकेचेही पेठ नाक्यावरील आणि रेडक्रॉस येथील एटीएम बंद आढळले. एसबीआयच्या तिडके कॉलनीतील एटीएममध्येही पैसे नव्हते. बँकांनी मात्र नियमित व्यवहारांसाठी अधिक रक्कम गरजेची असल्याने आणि एटीएममधून इतर बँकांचेही ग्राहक पैसे काढत असल्याने एटीएममध्ये रक्कमच भरली नाही. आपली रक्कम इतर ग्राहक वापरत असल्यानेच आता बँकांनी एटीएमला दुय्यम स्थान देत बहुतांशी एटीएम बंद ठेवली आहेत. ग्राहकांना बँकेतच जावून रक्कम काढावी लागत आहे. शिवाय बँकेत आपल्याच बँकेचे ग्राहक पैसे काढत असल्याने इतर ग्राहकांना आपले पैसेही वापरता येत नसल्याने तेवढी बँकेची बचत होत आहे. अशी अवस्था मेच्या पहिल्याच तारखेपासून सुरू असली तरी त्याचा खरा त्रास नोकरदारांच्या पगारानंतर अर्थात मेनंतरच जाणवण्यास सुरुवात झाली आहे. या काळात वेतन खात्यावर जमा झाल्याने ते पैसे काढण्यासाठी ग्राहक एटीएममध्ये जात आहे. परंतु, एटीएम एक तर बंद दिसत आहे. नाहीतर एटीएमच्या बाहेर ‘कॅश’ नसल्याचे फलक झळकत असल्याने ग्राहकांची रोकड असलेल्या एटीएमचा शोध घेताना चांगलीच दमछाक होत आहे. 
 
सोमवार नंतर स्थिती सुधारण्याची शक्यता 
एसबीआयच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. चलनच नसल्याने ही स्थिती उद‌्भवली आहे. सोमवारनंतर परिस्थिती सुधारेेल. नागरिकांच्या साेयीसाठी एटीएममध्ये पैसे भरण्यात येतील. -रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी 

 
बातम्या आणखी आहेत...