आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसऱ्या पर्वणीसाठी नियोजनाची सिद्धता, ‘नो एण्ट्री’पर्यंत दुचाकी नेण्यास मुभा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- रविवारी(दि. १३) होणाऱ्या दुसऱ्या शाही पर्वणीसाठी प्रशासनाने नियोजनाची सर्व सिद्धता केली आहे. कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीकाळात नवीन नियोजनानुसार नो एण्ट्री पॉइंटपर्यंत दुचाकी नेता येणार आहे, तसेच कुंभमेळा क्षेत्राव्यतिरिक्त शहरात इतरत्र सरकते बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. यामुळे मागील पर्वणीत शहरवासीयांची झालेली गैरसोय टळणार आहे.

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सेक्टर अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. यात नवीन नियोजनाच्या काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या.

नव्याने केलेले भाविक मार्ग, रस्त्यांचे नियोजन, स्नानाची ठिकाणे, बॅरिकेडिंग, वाहनतळे, गर्दी कमी असताना वाहतुकीचे नियोजन, गर्दी वाढल्यास त्यात कुठल्या बाबींचा अंतर्भाव करावयाचा, काय बदल करावयाचे, सरकते बॅरिकेडिंग, शाही मिरवणुकीच्यावेळी करावयाच्या आणि वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन ऐनवेळी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसह प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेत गर्दी नियंत्रणासाठीच्या करण्यात येणाऱ्या उपाययोजनांत लवचिकता ठेवण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी प्रत्यक्ष संबंधित सेक्टर अधिकाऱ्यांसह कर्मचारीही आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी पोहोचत सज्ज होणार आहेत. अवास्तव नियोजनामुळे निष्फळ ठरलेल्या पहिल्या पर्वणीच्या नियोजनात बदल करत पंधरा दिवसांपासून सर्वच विभागांकडून फेरनियोजन करण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या पर्वणीस भाविकांची मोठी गर्दी होणार असून, गुजरातमार्गेही भाविक येण्याची शक्यता यावेळी व्यक्त केली गेली. पर्वणीच्या दोन दिवस आधीच शुक्रवारी नाशिक आणि
..असा असेल स्थळनिहाय बंदोबस्त
..याप्रमाणे होणार कर्मचाऱ्यांच्या नेमणुका
नियोजनानुसार पोलिस बंदोबस्त सिंहस्थाच्यादुसऱ्या पर्वणीत लाखोंच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असल्याने गर्दीचा अंदाज घेऊन बॅरिकेडिंग नियोजनात बदल करण्यात येणार अाहेत. शहरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार असले तरी प्रत्यक्षात गर्दीचा अंदाज बघूनच रस्ते सुरू ठेवले जाणार आहेत.

पहिल्या पर्वणीत शहरवासीयांची अडवणूक झाल्यान बदललेल्या नियोजनात बल्ली बॅरिकेडिंगला फाटा देत सरकते बॅरिकेडिंग करण्यात आहे. नो एंट्री पॉइंटमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत.

पर्वणीच्या आदल्या दिवशी गर्दीचा अंदाजानुसार शनिवारी (दि. १२) सायंकाळी वाजेपासून ते रविवारी (दि. १३) रात्री १२ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. सर्व नियोजनावर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलिस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंघल, उपआयुक्त एन.अंबिका, मकरंद रानडे, पंकज डहाणे यांच्यासह अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहील.
त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने आता घाटांवरही भाविकांची संख्या पहिल्या पर्वणीच्या तुलनेत पाचपट असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरीही बाह्य वाहनतळांवरून येणारी वाहने गर्दीचा अंदाज घेऊनच सोडावी, उगाचच ही वाहने अडवू नयेत, गर्दी अधिक असल्यास वाहने तेथेच अडविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसारच अंतर्गत वाहनेही कुठपर्यंत न्यावीत, टप्प्याने पार्किंग मागे-मागे कशी आणावी, याबाबत विभागीय आयुक्तांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरबाबत स्थळनिहाय सूचना दिल्या.

बैठकीस जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मेळा अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक मेळा अधिकारी उदय किसवे, महेश पाटील, पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांच्यासह सर्वच विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
भाविकमार्गावरून वाहने जाण्याबाबत संभ्रम : भाविकमार्गावर गर्दी असल्याने तेथेच अपघात घडू शकतो, त्यामुळे कुठलेही वाहन जाणार नाही. नो व्हेइकल झोनच्या पुढे वाहन जाणार नाही, असे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी स्पष्ट केले. मात्र, पालिका आयुक्त गेडाम यांनी पाणी टँकरसह महत्त्वाची वाहने जाऊ देणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावर विभागीय अायुक्तांनी नंतर निर्णय घेण्याचे स्पष्ट केले.

पर्यायीनियोजनही तयार : दुसऱ्यापर्वणीसाठी आणि अशा प्रकारचे दोन नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे पहिले नियोजन अपयशी ठरल्यास लागलीच दुसरे नियोजन तयार ठेवण्यात आले आहे.

दुसरीपर्वणी ही आपली परीक्षाच : आम्हीसर्वच फिल्डवर राहणार आहोत. कारण शहरात आणि त्र्यंबकेश्वरचेही रस्ते गर्दीने भरून गेले आहेत. गेल्या पर्वणीच्या तुलनेत पाचपट गर्दी झाली आहे. ही पर्वणी आपली परीक्षाच असल्याचे सांगत जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले.

३५०जीवरक्षक : गोदाघाटावर३५० जीवरक्षक राहणार आहेत. त्यात रामकुंड, गांधी तलाव, टाळकुटेश्वर या ठिकाणी एकूण १५० जीवरक्षक, तर लक्ष्मीनारायण परिसरात तसेच इतर ठिकाणी एकूण १५० जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

साधुग्रामभोवती बॅरिकेडिंग तपोवनातीलमुख्य रस्त्यांसह साधुग्राममध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वच मार्गांवर बॅरिकेडिंग करून पोलिसांनी तटबंदी करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी (दि. ११) वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी साधुग्रामसह गोदाघाटाची पाहणी करून गर्दी नियोजनासाठी करण्यात आलेल्या फेरबदलाची माहिती पोलिस कर्मचाऱ्यांना दिली. बॅरिकेडिंगमुळे भाविकांना एक ते दीड किलोमीटरची पायपीट करत साधुग्राममध्ये जावे लागले. पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत, उपायुक्त अशोक मोराळे, उपायुक्त राजेंद्र बनसोडे, दीपक साकोरे, एम. डी. तांबडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी लक्ष्मीनारायण मंदिर चौक घाटाची पाहणी केली. मुंबई, अौरंगाबाद, धुळे, नाशिकरोड या मार्गांकडून येणाऱ्या भाविकांना गोदाघाटाकडे मार्गस्थ करण्याबाबतचे मार्गदर्शन या वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना केले.

यारस्त्यांवर बॅरिकेडिंग : साधुग्रामप्रवेशद्वार ते बडा लक्ष्मीनारायण मंदिर या मुख्य रस्त्यावर तसेच दोन्ही प्रवेशद्वारांलगत बॅरिकेडिंग, मारुती वेफर्स चौक, ट्रॅक्टर हाऊस, गोदा-कपिला संगमाकडे जाणारे दोन्ही रस्ते, पंचवटी कॉलेजकडून जाणारा रस्ता

फेरनियोजनाबाबत अधिकारीच संभ्रमात
कुंभमेळ्याच्यादुसऱ्या शाही पर्वणीसाठी पोलिस, एसटी आणि महापालिका यांनी फेरनियोजन करण्यात आले आहे. परंतु या फेरनियोजनाबाबत या विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम असल्याचे शुक्रवारी दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठकीत या अधिकाऱ्यांनीच आपल्यापुढील अडचणींची जंत्री मांडत त्यात सुधारणांची अपेक्षा व्यक्त केली.

दुसऱ्या पर्वणीसाठीच्या फेरनियाेजनाची माहिती विभागीय आयुक्तांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली या फेरनियोजनाबाबतच्या अडचणींची विचारणा केली. त्यानंतर पहिला प्रश्न महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनाच पडला. त्यांनी त्र्यंबकेश्वरमधून येणाऱ्या भाविकांसाठी ईदगाह मैदानावर बस सोडणार आहे की ठक्कर बाजार, सीबीएस अथवा मेळा स्थानक असा प्रश्न विचारला. पोलिस ईदगाह मैदान सांगतात तर एस.टी.कडून मात्र ठक्कर बाजार स्थानक आणि मेळा बसस्थानकांची माहिती िदली जाते. त्यामुळे शहरांतर्गत फिरणाऱ्या बसेस कुठून सुटणार आणि उपलब्ध होणार, असाही संभ्रम त्यांना पडला. अखेर त्याबाबत स्पष्टता होताच मुद्दा सर्व स्थानके जवळच असल्याचे सांगत निकाली निघाला. त्यानंतर पाणी टँकर वैशिष्ट्य मार्गावर सोडले जात नसल्याने तेथे स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पहिल्या पर्वणीत निर्माण झाल्याचे उपायुक्त यू. बी. पवार यांनी उपस्थित केल्यानंतर परिस्थिती पाहून ते सोडण्यात येईल, असे सागंण्यात आले.

शाही मार्ग : उपायुक्तसहायक आयुक्त निरीक्षक ४१ उपनिरीक्षक, ५४९ कर्मचारी, २७० होमगार्ड.
मिरवणूक: उपायुक्तसहायक आयुक्त निरीक्षक, २२ उपनिरीक्षक, १३५ कर्मचारी, ७५ होमगार्ड.
रामकुंड: उपायुक्त,सहायक आयुक्त, निरीक्षक, ३२ उपनिरीक्षक, ४२० कर्मचारी.
साधुग्राम: पोलिसउपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, ११ पोलिस निरीक्षक, ३० पोलिस उपनिरीक्षक, ५५० पोलिस कर्मचारी, ३०० होमगार्डचे कर्मचारी जवान.

परतीचामार्ग : पोलिसउपायुक्त, पोलिस सहायक आयुक्त, पोलिस निरीक्षक, २४ पोलिस उपनिरीक्षक, १२३० पोलिस कर्मचारी, २७० होमगार्ड.

पोलिस आयुक्त, १५ उपआयुक्त, ४४ सहायक आयुक्त, २०० निरीक्षक, ६०० उपनिरीक्षक, १२ हजार ६०० कर्मचारी आणि २९०० शहर कर्मचारी असे १५ हजार कर्मचारी, ४१०० होमगार्ड, २०१ वाहने, बीडीडीएसचे १२ पथक, एसआरपीच्या तुकड्या. या प्रत्येक तुकडीत ४५ कर्मचारी, फोर्स वनच्या तुकड्या, क्युआरटीच्या तुकड्या यासह एसआरपीएफ, सीआरपीएफ, बीएसएफच्या १७ कंपन्या शहरात दाखल झाल्या आहेत. यासह एटीएस, एसआयडी, सीआयडी आणि आयबीचे स्वतंत्र पथक कार्यरत राहणार आहे. त्याचप्रमाणे सेक्टरनिहाय बंदोबस्ताचे १५ पोलिस उपआयुक्त, ४५ सहायक आयुक्त, २२५ निरीक्षक, ७०१ उपनिरीक्षक, एकूण १८ हजार कर्मचारी याप्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे.

बंदोबस्ताची रंगीत तालीम
सिंहस्थाच्यादुसऱ्या पर्वणीसाठी पोलिस यंत्रणेचे नियोजन पूर्ण झाले असून, शुक्रवारी मध्यरात्री १६ हजार पोलिस शहरात तैनात करण्यात आले आहेत. दुसऱ्या पर्वणीसाठी लाखोंच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असल्याने अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासह मूव्हेबल रोप बॅरिकेडिंगच्या साहाय्याने भाविक मार्गांची तटबंदी करण्यात येत अाहे. शहर आणि परिसरातील जवळपास सर्व रस्ते खुले राहणार आहेत. रस्ते खुले असल्याने प्रत्येक ‘एंट्री पॉइंट’वर पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. या पर्वणीसाठी बीएसएफ आणि आरपीएफचे जवान तैनात करण्यात येणार आहेत.

कोअर परिसर : दिंडोरीनाका, मखमलाबाद नाका, अशोकस्तंभ, ज्योती बुक डेपो, टिळकवाडी सिग्नल, जलतरण तलाव, गडकरी सिग्नल, सारडा सर्कल, बागवानपुरा, ट्रॅक्टर हाऊस, संतोष टी पॉइंट, काट्या मारुती चौक येथून रामकुंड अथवा या क्षेत्राच्या आतील बाजूस राहणाऱ्या नागरिकांनी रस्त्यांवर वाहने पार्क करण्यास बंदी राहील.

- शहरांतर्गत बस व्यवस्था सुरू राहाणार. प्रवासनिहाय बसचे तिकीट दर लागू असतील.
-श्र गर्दीचा अंदाज घेऊन शहरात येणारी वाहने पार्किंगमध्ये थांबविली जातील.
- सरकत्या बॅरिकेडिंगचा अधिक वापर. भाविकांना जास्त अंतर चालावे लागणार नाही.
- शाही मिरवणुकीत प्रत्येक आखाड्याच्या मागे आणि पुढे रुग्णवाहिका असेल.
- शाहीमार्गासह भाविक मार्गावर रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहने. सूचना किंवा काही अपघात घडल्याखेरीज त्यांनी ठिकाणा सोडल्यास कारवाई
- गर्दी कमी झाल्यानंतरच स्वच्छता
-एसटी पोलिस यांनी समन्वय राखून सतत संपर्कात राहावे
- सर्व मार्गांवर पाणी टँकर व्यवस्था
- प्रत्येक घाटावर जीवरक्षक नेमावेत

अशी राहील शटल बससेवा
पाथर्डीगाव ते महामार्ग : (५ बस) मार्ग : विनयनगर,जॉगिंग ट्रॅक, महामार्ग, चांडक सर्कल, मायको सर्कल, जिल्हा रुग्णालय

गिरणारेते डोंगरे वसतिगृह : (१० बस) मार्ग : सोमेश्वर,आनंदवली
भगूरते महामार्ग : (१५ बस) मार्ग : देवळाली,वडनेर गेट, पाथर्डी फाटा, महामार्ग, चांडक सर्कल, मायको सर्कल, जिल्हा रुग्णालय

नाशिकरोडते महामार्ग : (५० बस) मार्ग : आंबेडकरनगर,डीजीपीनगर, वडाळागाव, वनवैभव, लेखानगर, महामार्ग, चांडक सर्कल, मायको सर्कल, जिल्हा रुग्णालय

म्हसरूळते डोंगरे वसतिगृह : (५ बस) मार्ग : मेरी,आरटीऑ कॉर्नर, चोपडा लॉन्स
म्हाडाकॉलनी ते ईदगाह मैदान : (५ बस) मार्ग : सातपूर,मायको सर्कल, जिल्हा रुग्णालय
उत्तमनगरते ईदगाह मैदान : (५ बस) मार्ग : विजयनगर,राणा प्रताप चौक, लेखानगर, महामार्ग, चांडक सर्कल, मायको सर्कल, जिल्हा रुग्णालय

नाशिकरोडते काठेगल्ली (५० बस) मार्ग: अशोकाटॉवर, काठेगल्ली सिग्नलमार्गे नाशिकरोड अशा एकूण १८० बस शहरांतर्गत धावणार आहेत.