आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: तीन दिवसांत दुसरा बिबट्या जेरबंद, परिसरात आणखी एका बिबट्याचा वावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन दिवसांपासून परिसरात वावरणाऱ्या बिबट्याला खडांगळी येथे पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर ताे असा अाक्रमक झाला हाेता. - Divya Marathi
दोन दिवसांपासून परिसरात वावरणाऱ्या बिबट्याला खडांगळी येथे पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर ताे असा अाक्रमक झाला हाेता.
नाशिक- खडांगळी येथे दोन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात दहशत होती. वनविभागाने रविवारी पिंजरा लावल्यानंतर त्यात नर बिबट्या अडकल्याचे सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. दरम्यान, तीनच दिवसांत दुसऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले असून, परिसरात आणखी एक बिबट्या असल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सुभाष कारभारी ठोक यांना वस्तीजवळील मक्याच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यांनी माणिक कोकाटे, कैलास ठोक, सतीश गोविंद कोकाटे यांना याबाबत माहिती दिली. वनविभागाला कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्या असल्याची शहानिशा करण्यात आली. रविवारी सायंकाळी लगेचच गट क्रमांक २९४ मध्ये पिंजरा लावण्यात आला. रात्री उशिरापर्यंत बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकतो की काय यावर लक्ष ठेवण्यात आले. तथापि, बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकला नाही.

तीन दिवसांत दुसऱ्या बिबट्या जेरबंद
शुक्रवारी दोन वर्षांची मादी बिबट्या याच वस्तीवरील मक्याच्या शेतात पिंजऱ्यात अडकली होती. तीन दिवसांनंतर त्याच ठिकाणच्या कैलास ठोक यांच्या शेतात चार वर्षाचा नर बिबट्या पिंजऱ्यात अडकला. सात फुटाहून अधिक लांब असलेला बिबट्या रात्रीची शिकार केली असल्याने पिंजऱ्यात सुस्त पडून होता. नाशिक पश्चिम विभागाचे उपनवनसंरक्षक टी ब्युअला, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप भामरे, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्या पकडण्यात कर्मचाऱ्यांना यश आले.

तिसऱ्या बिबट्याचा वावर
खडांगळीसह वडांगळी, मेंढी परिसरात आणखी एका बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांनी सांिगतले. त्यामुळे परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...