आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे लाक्षणिक उपोषण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या तीन महिन्यांतच मार्गी लावण्याचे 13 मार्च 2013 रोजी दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्याची पूर्ती लवकर न झाल्यास बारावीच्या परीक्षांवरील बहिष्कार कायम ठेवण्याचा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी एक दिवसाच्या धरणे आंदोलनाद्वारे दिला.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मार्च 2013 च्या बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर तीन महिन्यांत मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांनी दिले. त्यानंतर कार्यवाही न झाल्याने 5 सप्टेंबरला शिक्षकदिनी धरणे आंदोलन करण्यात आले व काळ्या फिती लावून काम करण्यात आले. त्यानंतर नऊ महिने उलटले तरीही कार्यवाही न झाल्याने अखेर शिक्षकांनी सोमवारी धरणे आंदोलन केले. तसेच, 20 जानेवारीस उपसंचालक कार्यालयावर धरणे धरण्यात येणार आहे. त्यानंतरही निर्णय न झाल्यास मौखिक परीक्षांवर बहिष्कार घालून आंदोलनास सुरुवात होणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. या वेळी अध्यक्ष प्रा. के. एन. अहिरे, सरचिटणीस प्रा. संजय शिंदे, उपाध्यक्ष प्रा. एन. जे. पाटील, सहसचिव डी. जे. दरेकर यांसह मोठय़ा संख्येने शिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.