आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मेघवाल अाज करणार सिक्युरिटी प्रेसची पाहणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थराज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल सोमवारी (दि. २) करन्सी नोट प्रेस इंडिया सिक्युरिटी प्रेसला भेट देणार आहेत. मंत्र्यांच्या भेटीमुळे प्रलंबित समस्या सुटण्याच्या अपेक्षेने कामगारांचे या भेटीकडे विशेष लक्ष लागून आहे. 
 
दाेन्ही प्रेसमध्ये पाच हजार कामगार कामदार (अधिकारी)आहेत. सातवा वेतन आयोग लागू व्हावा म्हणून मजदूर संघाने अर्थमंत्र्यांना साकडे घातले होते. औरंगाबाद येथे कागद निर्मिती करणाऱ्या परदेशी खासगी कंपनीला केलेला विरोध, मयत कामगारांच्या वारसांना कामावर घेण्याची मर्यादा २५ टक्के करावी, करन्सी नोट प्रेस सुरू झाल्यापासून यंत्रणेचे ओव्हर हाँलिंग केले नसल्याने नोट निर्मितीसाठी लागणारा विलंब, त्यासाठी मजदूर संघाने नवीन यंत्रणेची केलेली मागणी या सर्व बाबींवर केंद्रीय अर्थराज्यमंत्री काही निर्णय घेतात का, याकडे सर्व कामगारांचे लक्ष आहे. 

पावणेदोन महिन्यांनी कामगारांना मिळणार सुटी : नोटबंदीच्या निर्णयानंतर पावणे दोन महिन्याने प्रेस कामगारांना रविवारची सुटी मिळाली. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. बहुतांश कामगारांनी रविवारची सुटी ही कुटंुबासोबत घालविली. 

निराकरणाची अपेक्षा 
^केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांकडे यापूर्वी आम्ही प्रेस आणि कामगारांबाबत समस्या मांडल्या आहेत. सोमवारी त्यांच्या दौऱ्यादरम्यान आम्हाला त्यांच्याकडून समस्यांचे निराकरण होण्याची अपेक्षा आहे. -ज्ञानेश्वर जुंद्रे, कार्याध्यक्ष, मजदूर संघ 

सकारात्मक निर्णय हवा 
^औरंगाबादला खासगी कंपनीला आम्ही विरोध केला. ते काम नाशिकरोड प्रेसला मिळावे म्हणून प्रयत्न करत आहाेत. त्या जागेची पाहणी होत असल्याने सकारात्मक निर्णयाची आशा आहे. -जगदीश गोडसे, जनरल सेक्रेटरी, मजदूर संघ 
 
बातम्या आणखी आहेत...