आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात मदतकर्त्यांना कायद्याचे ‘सुरक्षा कवच’, वाचतील अनेकांचे प्राण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रस्त्यावर कितीही गंभीर स्वरूपाचा अपघात झाला तरीही हळहळ व्यक्त करण्याशिवाय फारसे काेणी मदतीला धावताना दिसत नाही. पोलिसांचा ससेमिरा आणि कोर्टाची पायरी चढण्याची कृती टाळण्यासाठी नागरिक आपल्या संवेदनांना आवर घालताना दिसतात. ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास एका प्रकरणात आल्यानंतर अपघातांत मदत करणाऱ्यांची कोणत्याही प्रकारची चौकशी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला आहे.

यापुढील काळात कोणी मदत करणाऱ्याची चौकशी केली तर चौकशीच्या स्वरूपानुसार त्या पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करतील, असेही या आदेशात म्हटले आहे. देशात रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये जखमींना वेळेवर उपचार मिळाल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण सुमारे ७० टक्के आहे. राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातानंतर अनेकदा जखमी कित्येक तास मदतीविना तडफडत असतात. परंतु, मदतीला कोणी येत नाही. अपघाताला जबाबदार असणाऱ्यांपेक्षा मदत करणाऱ्याचीच अधिक चौकशी पोलिसांकडून होत असल्याचा आजवरचा अनेकांचा अनुभव आहे. केव्हा अपघात झाला, तुम्ही पाहिले का, समोरासमोर अपघात झाला की, मागच्या चाकात आला यासारख्या प्रश्नांचा ससेमिरा सुरू होतो. इतकेच नाही अनेकदा अपघाताला तुम्ही जबाबदार नाही हे कशावरून असाही प्रश्न विचारला जातो. त्यामुळे मदत करणाऱ्याची मानसिक स्थिती ढासळू शकते. अपघाताच्या पंचनाम्यावर मदत करणाऱ्यांनी स्वाक्षरी केल्यास, त्यास न्यायालयाच्या तारखांना हजर राहावे लागते. त्यामुळे यापुढील काळात मदतच करायची नाही, अशी मानसिकता संबंधिताची होऊ शकते. ही बाब लक्षात आल्यावर काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मदत करणाऱ्याची चौकशी करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.
मदतकर्त्याची ओळख गुप्त ठेवणार...
अपघाता नंतर मदत करण्याची मानसिकता वाढावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याची प्रत उपलब्ध आहे. त्यानुसार अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचविल्यानंतर मदत करणाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी केली जाणार नाही. अपघातात मदत करणाऱ्यांची ओळख गुप्त राखण्यात येईल. जीवन बनसोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी
बातम्या आणखी आहेत...