आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे दिसत होते शिर्डीचे साईबाबा, या दिवशी 10 लाखांहून जास्त भाविक येतात शिर्डीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गुरूंना वंदन करण्याचा, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा दिवस गुरुपौर्णिमा 9 जुलैला आहे. तसे पाहिले तर प्रत्येक दिवशी साईबाबांच्या समाधी दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने लोक शिर्डीत येतात. परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी 10 लाखांहून जास्त भाविकांची उपस्थिती असते. साईबाबांबद्दल असे सांगितले जाते की, त्यांनी आपल्या भक्तांना आपल्या मृत्यूची तारीख अगोदरच सांगितली होती.
 
बाबांचे सर्वधर्मीय भक्त आहेत...
- शिर्डीच्या साईबाबांचे भक्त जगभरात आहेत. त्यांच्या दयेचा स्वभाव आणि चमत्कारांच्या अनेक कथा आजही मोठ्या भक्तिभावाने सांगितल्या जातात.
- बाबांचे भक्त त्यांचे चित्र वा मूर्ती आपल्या घरात आवर्जून ठेवतात. साईबाबांचा हा फोटो तब्बल 100 वर्षे जुना असल्याचे सांगितले जाते. तथापि, हा फोटो कुणी काढला याची माहिती उपलब्ध नाही.
 
लोकांच्या कल्याणासाठी जीवन समर्पित केले...
- साईबाबांनी आपले पूर्ण जीवन जनसेवेत व्यतीत केले. त्यांनी प्रत्येक क्षणी इतरांचे दु:ख दूर केले.
- बाबांच्या जन्मासंबंधी कोणताही स्पष्ट उल्लेख मिळत नाही.
-साईबाबांच्या चमत्कारांचे रहस्य त्यांच्या सिद्धांतांमध्ये मिळते. त्यांनी काही असे सूत्र दिले, ज्यांच्या साह्याने यशस्वी होता येते.
- स्वत: सर्वशक्तीने संपन्न असूनही त्यांनी स्वत:साठी शक्तीचा उपयोग केला नाही.
- सर्वकाही मिळवण्याची क्षमता असतानाही त्यांनी अतिशय साधेपणाने जीवन व्यतीत केले आणि हीच शिकवण त्यांनी जगालाही दिली.
(स्रोत: साई सच्चरित्र, अध्याय 43-44) फोटो - साईबाबांच्या पुण्यतिथी समारोहाचे

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा शिर्डीचे साईबाबांचे काही दुर्मिळ फोटोज, या फोटोंना भक्त खरे असल्याचे मानतात...
बातम्या आणखी आहेत...