आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Self Employment Training, Latest News In Divya Marathi

महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महिला दिनाच्या मुहूर्तावर नाशिक महानगर शिवसेना महिला आघाडी व अभिनव रोजगार स्वयंरोजगार प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्रातर्फे महिलांसाठी रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षणाच्या शासकीय अभ्यासक्रमाची घोषणा करण्यात आली. एक महिना कालावधीच्या या अभ्यासक्रमात विविध क्षेत्रातील विषयांना प्राधान्यानुसार प्रवेश दिला जाणार आहे.
बचतगटातील महिलांना स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे असल्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला. प्रशिक्षणानंतर यशस्वी प्रशिक्षणार्थी महिलांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. प्रशिक्षणानंतर प्रकल्प अहवाल, कच्च्या मालाचा पुरवठा, शासकीय परवानग्या, कर्ज प्रकरण, विक्री व्यवस्था इत्यादी विषयांवर मोफत मार्गदर्शन केले जाईल. यातून पहिल्या आदर्श शंभर बचत गटांची निवड करुन त्यांना रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मातोर्शी महिला बचत गट महासंघास जोडण्यात येणार आहे.
कार्यक्रम यशस्वितेसाठी वंदना बिरारी, मेघा प्रधान, सुरेखा लोळगे, डॉ. वृषाली सोनवणे, शुभेच्छा बडगुजर, सुमेधा साढेकर, वैशाली चव्हाण, सुनीता कोठुळे, नीलेश कुलकर्णी प्रयत्नशील आहेत.