आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sales And Tax Deputy Commissioner Stuck For Launching Case, Nashik

विक्रीकर उपआयुक्तांना लाच घेताना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तक्रारदाराकडून५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना विक्रीकर उपआयुक्त अमृतसिंग ठाकूर यांना गुरुवारी दुपारी ४.३० वाजता विक्रीकर विभागाच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली.

तक्रारदार यांच्या कंपनीस विक्रीकर विभागाकडून एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०११ या वित्तीय वर्षाचा निर्धारण आदेशातील कर, दंड व्याजाची ३.२५ कोटी रुपये रकमेचा शासनास भरणा करावा, याबाबत विक्रीकर उपआयुक्त अमृतसिंग ठाकूर यांच्या स्वाक्षरीने ३१ मार्च रोजी आदेश देण्यात आला होता. ही रक्कम जास्त असल्याने तक्रारदाराने ठाकूर यांची भेट घेऊन हा आदेश रद्द करण्याची विनंती केली होती. ठाकूर यांनी या बदल्यात दीड लाखाची मागणी तक्रारदाराकडे केली होती. अखेर तडजोडीनंतर ५० हजार रुपयांची लाच देण्याचे मान्य झाले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली असता गुरुवारी दुपारी सापळा लावण्यात आला. त्या वेळी अमृतसिंग ठाकूर यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले अटक करण्यात आली.