आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sena Bjp Seat Distribution Issue At Nashik, Divya Marathi

मोदी लाट, मागण्यांचा थाट! महानगरातील चारपैकी तीन जागांवर भाजपचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेचा प्रभाव विधानसभा निवडणुकीतही दिसून येईल, असा विश्वास भाजपला वाटत असल्याने नाशिकरोड मंडलाने गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेकडे असलेल्या देवळाली मतदारसंघावर दावा सांगितला आहे. याशिवाय, शहरातील उर्वरित तीनपैकी दोन जागा कायम ठेवण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्याकडे केली आहे.

भाजपने सध्या शिवसेनेकडे असलेला देवळाली व सिडको मतदारसंघ सोडण्याची मागणी पक्षनेतृत्वाकडे केली आहे. दिवंगत भिकचंद दोंदे यांनी पूर्वी देवळालीतून भाजपचे नेतृत्व केले आहे. येथे भाजपचा पारंपरिक मतदार आहे. त्यामुळे भाजपला येथे सहजरीत्या यश मिळू शकते. त्यामुळे या जागेची मागणी केल्याचे मंडल अध्यक्ष बाजीराव भागवत यांनी सांगितले.

घोलपपुत्राचे लाँचिंग
वडनेर येथे वाढदिवसाचे निमित्त साधत आमदार बबन घोलप यांनी शिवसैनिकांचा मेळावा घेऊन पुत्र योगेशचे लाँचिंग केले. आमदार घोलप यांचे भ्रष्टाचार प्रकरणी झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळवून फेरयाचिका दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात यश आले तर ठीक, नाहीतर पुत्र योगेशला ते मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत.

हास्यास्पद मागणी
या भागात भाजपाच्या शाखा नाही, कार्यकर्ते नाहीत आणि नगरसेवकही नाहीत, अशी देवळालीत भाजपची अवस्था आहे. 2009 च्या निवडणुकीत भाजपला दोनपैकी एक जागा जिंकता आली नाही, त्यांनी तीन जागांची मागणी करणे हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

काँग्रेसजनांची नजर
देवळालीतून भाजपकडून नगरसेवक कुणाल वाघ, प्रा. शरद मोरे, जयद्रथ काकडे हे भाजपकडून इच्छुक असून, यात सिन्नर फाटा भागाचे काँग्रेसचे नगरसेवक कन्हैया साळवे यांच्या नावाचा समावेश आहे. साळवे हे पूर्वार्शमीचे भाजपचे नगरसेवक असून, उमेदवारी मिळाल्यास काँग्रेसची साथ सोडण्याची त्यांची तयारी आहे.