आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sena Chief Uddhav Thackeray Slams Sharad Pawar\'s Statement At Workers\' Rally

शरद पवारच एनडीएच्या संपर्कात; उद्धव ठाकरे यांचा नाशिकमध्ये गौप्यस्फोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘शरद पवार यांनी दोनदा मतदानाचे वक्तव्य करत राष्ट्रवादीच्या खासदारांचे विजयाचे गुपितच जाहीर केले आहे. पवारांच्या पोटातले त्यांच्या ओठांवर आले आहे,’ अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. शिवसेनेचे खासदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा खोडून काढतानाच, शरद पवारच एनडीएच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट ठाकरे यांनी केला.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, वादग्रस्त वक्तव्य करण्याची कला पवारांकडे उपजत आहे. त्यांचे वक्तव्य म्हणजे लोकशाहीची क्रूर थट्टा आहे. शिवसेनेचे काही खासदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता उद्धव म्हणाले की, या चर्चांना काहीही अर्थ नाही; याउलट पवारच एनडीएच्या संपर्कात आहेत. पवारांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. वर्षानुवर्षांपासून काम करणार्‍या शिवसैनिकांना उमेदवारी देण्याचा आमचा प्रयत्न आहे, परंतु त्यामुळे एनडीएला कोणतीही अडचण येणार नसल्याचेही ते म्हणाले.

पुढे वाचा, छगन भुजबळांबरोबर सेटिंग नाहीच, त्यांचे घोटाळे बाहेर काढा’