आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरामेडिकल अन् नर्सिंगसाठी आता लवकरच स्वतंत्र मंडळ होणार स्थापन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘वैद्यकीय क्षेत्रातील पॅरामेडिकल अन् नर्सिंगच्या अभ्यासक्रमांमध्ये उच्च दर्जाची गुणवत्ता निर्माण करण्यासाठी या दोन्ही विभागांसाठी लवकरच स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्यात येईल. पॅरामेडिकल कौन्सिल अर्थात ‘महाराष्ट्र परावैद्यक परिषद बिल 2012’ च्या अंतर्गत सर्व पॅरामेडिकल पदवीधारक येणार असून त्यांना नोंदणी करणे बंधनकारक होणार आहे. पॅरामेडिकल क्षेत्रासाठी हा कायदा महत्त्वाचा असून त्याची राष्ट्रपतींकडून मंजुरीसाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी रविवारी दिली.
असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी अ‍ॅनालिस्ट अ‍ॅण्ड प्रॅक्टिशनर्स संघटनेच्या सातव्या राज्यव्यापी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार समीर भुजबळ, आमदार जयंत जाधव, संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब करोले आदी उपस्थित होते.