आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळशाची वाहतूक करणा-या मालवाहतूक रेल्वेला आग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनमाड - रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या कोळशाची वाहतूक करणा-या मालगाडीच्या एका डब्यातून गुरुवारी दुपारी ठिणग्या उडून अचानक धूर निघू लागल्याने रेल्वे स्थानकात एकच खळबळ उडाली. प्रशासन कर्मचा-यांनी तत्काळ धावपळ करून मनमाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने या डब्यावर पाण्याचे फवारे सोडून आगी लागल्यापूर्वीच आटोक्यात आणली.

फलाक क्रमांक १च्या बाजूस असलेल्या लूप लाइनवर नागपूरकडे जाण्यासाठी कोळशाने भरलेली रेल्वे वॅगन बराच वेळ डाउन मार्गावर उभी होती. त्याच वेळी दुपारी बाराच्या सुमारास वॅगनच्या कोळसा भरलेल्या डब्यास (इ. आर. १११४८१) धूर निघू लागला. ही बाब फलाटावर असलेल्या रेल्वे कर्मचा-यांच्या लक्षात आली. पूर्व रेल्वे वॅगन कोळशाने भरलेली असल्याने सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले. नगरपालिकेच्या अग्निशमन दलास माहिती देण्यात आली. पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. रेल्वे पार्सल कार्यालयाच्या बाजूला ही गाडी उभी करून पाइपलाइन जोडण्यात आली. ज्या लूप लाइनवर ही रेल्वे उभी होती त्यावरील अति उच्चदाबाचा विजेचा प्रवाह बंद करण्यात आला. धूर निघत असलेल्या डब्यात पाऊण तास पाणी फवारण्यात आले. त्यामुळे आग लागली नाही. प्रशासनाच्या तत्परतेमुळे आगीची संभाव्य घटना टळली. त्यानंतर संपूर्ण रेल्वेची तपासणी करण्यात आली. सध्या शहर परिसरात तपमानाचा पारा वाढत आहे. गेल्या काही दिवसांत तपमान ३१ अंशांवर पोहोचले आहे. अशा वातावरणात कोळशाने भरलेली रेल्वे बराच वेळ उभी राहिल्याने कोळशाने पेट घेतल्याचा अंदाज आहे.