आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकमध्ये सेटटॉपच्या तारखेवरून गोंधळाची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- करमणूक कर वसुलीत कुठलीही शंका न राहण्यासाठी संबधित एमएसओ (मल्टी सिस्टीम ऑपरेटर) व केबलचालकांकडून ग्राहक संख्येचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे. मात्र, आता हा कर वसूल करताना सेटटॉप बॉक्स बसवल्याच्या तारखेवरून गोंधळ होण्याची शक्यता वाढली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करमणूक कर स्वीकारण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. केबल चालकांच्या म्हणण्यानुसार तो स्वीकारला जाणार नसून, सध्याच्या ग्राहक संख्येनुसारच तो वसूल केला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी स्वत:च एमएसओंची बैठक घेतली. आता ते केबल चालकांचीही 3 सप्टेंबरला बैठक घेणार असून दोघांनीही ग्राहकांची दिलेली माहिती सत्य असल्याचे प्रतिज्ञापत्रच लिहून देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे 31 मार्चनंतरच्या संख्येनुसार कर वसुली होण्याचे निश्चित झाले आहे.

प्रशासनाने योग्य कर वसुली होण्यासाठी प्रतिज्ञापत्राचा जालीम तोडगा शोधला असला तरी सेटटॉप बॉक्स बसवल्याच्या तारखांवरून मात्र केबल चालक प्रशासनाची दिशाभूल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्च-एप्रिलमध्ये सेटटॉप बॉक्स बसवलेल्या ग्राहकाने जुलै-ऑगस्टमध्ये बॉक्स बसविल्याचे भासवत तेव्हापासूनच कर भरला जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यावरून प्रशासन व केबल चालकांचे बिनसण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, आठ दिवसांत सर्वच ग्राहकांची संख्या सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याने आठ दिवसानंतरच कर वसुलीस प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित राहिलेला प्रश्न काही प्रमाणात तरी मार्गी लागण्याची शक्यता आहे.