आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वस्त सेटटॉपच्या आमिषातून नाशिकमध्ये ज्येष्ठ नागरिकास गंडवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- केवळ 74 रुपयांमध्ये सेटटॉप बॉक्स देण्याचे आमिष देऊन इंदिरानगर येथील ज्येष्ठ नागरिकाची धनादेशाद्वारे 96 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दत्तात्रय केदू कोठावदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रोहन मोरे याने त्यांच्या घरी येऊन खासगी कंपनीचा प्रतिनिधी असल्याची बतावणी करीत कंपनी ज्येष्ठ नागरिकांना केवळ 74 रुपयांच्या धनादेशावर चाज्रेबल सेटटॉप बॉक्स व रिमोट देत असल्याचे सांगितले. त्यासाठी दोन धनादेशांची मागणी केल्यावर कोठावदे यांनी ते दिले. मात्र, त्यांची नजर चुकवून मोरेने आणखी एक धनादेश लांबवला व बनावट सही करून कोठावदे व त्यांच्या पत्नीच्या संयुक्त खात्यातून 96 हजार रुपये काढून घेतले. खात्यातून परस्पर पैसे काढल्याचे समजताच कोठावदे यांच्या सर्व प्रकार लक्षात आला. इंदिरानगर पोलिस ठाण्यात मोरेाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अशी सावधानता बाळगा..
> सेटटॉप बॉक्सची किंमत सुमारे एक हजार रु. असून 74 रुपयांना देण्याचे कोणी सांगत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नका.
> अधिकृत केबलचालकांकडेच सेटटॉपचे पैसे जमा करा.
> सेटटॉप बॉक्स बसवण्यासाठी अथवा बॉक्स नोंदणीची माहिती देण्यासाठी घरी आलेल्या व्यक्तीचे ओळखपत्र तपासा.
> ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणत्याही कंपनीची विशेष योजना अथवा सूट नाही.
> केबलचालकाकडे ग्राहक नोंदणी अर्ज (सीआरएफ) भरून कागदपत्रे द्यावीत.
> धनादेशाऐवजी रोख रक्कम देणेच योग्य.

..तरीही भामटा ‘फरार’
मोरे याने नाशिकरोड, उपनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत असाच गंडा घातल्याच्या तक्रारी आहेत. या प्रकरणी चार गुन्हे दाखल असूनही तो पोलिसांच्या हाती लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, नागरिकांनी कुठल्याही भूलथापांना बळी न पडता अधिकृत केबलचालकाकडूनच सेटटॉप बॉक्स बसवावे, असे आवाहन हाथवे कंपनीचे दिलीप सानप यांनी केले आहे.