आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस आयुक्तालयात स्थापणार ग्रंथालय, १५ ऑक्टोबर राेजी प्रारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पोलिस आयुक्तालयात आयुक्तांनी अनेक लोकाभिमुख उपक्रम सुरू केले आहेत. अाता आणखी एक अभिनव उपक्रम आयुक्तांनी सुरू केला असून, फुलगुच्छांना फाटा देत भेटण्यास येणाऱ्यांनी एक पुस्तक भेट देण्याचे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे. या माध्यमातून पोलिस आयुक्तालयात १५ ऑक्टोबरला डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्यात येईल. या उपक्रमास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, पुस्तक भेट देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी रस्त्यांवरील निराधारांना शाल, बिस्कीट वाटप करून आधार देण्याचा प्रयत्न केला. पोलिस कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांचे वाढदिवस त्यांच्या कुटुंबीयांसमवेत साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राज्यातील पहिलेच हॉलिडे होमही सुरू केले. अाता ग्रंथालय उपक्रम सुरू करीत भेट देण्यास येणाऱ्या व्यक्तींना पुष्पगुच्छ आणता एक पुस्तक आणण्याचे आवाहन त्यांनी केले अाहे. पोलिस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींसह पोलिस ठाणे हद्दीतील गरीब मुलांना ज्ञान संपादन आणि अत्याधुनिक कौशल्य आत्मसात करता यावे, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

वाचनालय सुरू करण्यासाठी बुक बँक उघडली आहे. शहरातील दानशूर वाचनप्रेमी नागरिकांनी त्यांच्याजवळ असलेले जुने पुस्तक जवळील पोलिस ठाण्यात अथवा आयुक्तालयात जमा करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. पुस्तक जमा करण्यासाठी पाेलिस निरीक्षक प्रकाश सपकाळे (९५९४९४५४२६), निरीक्षक विलास सोनवणे (९९२३४३३३५९) यांच्याशी संपर्क साधावा.

उपक्रमास साथ द्यावी
^शहरपरिसरातील गरीब मुलांना वाचनाची गोडी लागावी. त्यांना शिक्षण घेता यावे याकरिता पोलिस आयुक्तालय पोलिस ठाण्यात वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. पुष्पगुच्छ आणता एक पुस्तक भेट द्यावे अाणि उपक्रमास दानशूर, वाचनप्रेमी नागरिकांनी साथ द्यावी. -डॉ. रवींद्रकुमार सिंघल, पोलिस आयुक्त
बातम्या आणखी आहेत...