आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेतू कार्यालय नाशिककरांसाठी आता २४ X7 राहणार सेवेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एरवी १० ते या शासकीय वेळेतच मिळणारी ‘सेतू’ची सुविधा आता २४ तास मिळणार आहे. विशेष म्हणजे नवीन ठेकेदाराने पिण्याचे पाणी आणि नागरिकांना बसण्याची सुविधा देत जणू ‘सेतू’ला कॉर्पोरेट लूकच दिला असून, त्याचा शुक्रवार (दि. १)पासून प्रारंभही झाला आहे.
शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षांनंतर आता लागलीच प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होणार असून, त्याची तयारी म्हणून प्रशासनाने अखेर शुक्रवारपासून ‘सेतू’साठी नवीन ठेकेदाराची नेमणूक केली आहे. गुजरात इन्फोटेक या कंपनीस ठेका देण्यात आला असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य कार्यालयासह महापालिका विभागनिहाय चारही केंद्रांचा त्यांनाच ठेका देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलशेजारील मध्यवर्ती सेतू कार्यालयाचे शुक्रवारी उद््घाटन झाले. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी नागरिकांना वेळेत सुविधा देण्यासाठी ‘सेतू’चे संपूर्ण स्वरूप बदलल्याचे सांगत ठेकेदारानेही कुणाचीही तक्रार येऊ देता उत्तम सेवा देण्याच्या सूचना दिल्या. नवीन ‘सेतू’मार्फत जुन्यासह काही नवीन सुविधा दिल्या जाणार आहेत.

महाऑनलाइनसॉफ्टवेअरचा होणार वापर : राज्यभरदाखल्यांचे एकच स्वरूप ठेवण्यासाठी शासनाने महाऑनलाइनवर ‘सेतू’ची जबाबदारी सोपविली आहे. मात्र, नाशिकच्या जुन्या ठेकेदाराने महाऑनलाइनचे सॉफ्टवेअर वापरता त्याने स्वत: तयार केलेलेच सॉफ्टवेअर वापरण्याचे सांगितल्याने अखेर ठेका बदलण्यात आला. त्यानुसार आता महाऑनलाइनच्या सॉफ्टवेअरनुसार कामकाज सुरू राहील. त्यात आता दाखला अपलोड केल्यापासून ते त्याच्या स्वाक्षरीपर्यंतचा सर्वच प्रवास अर्जदाराला ऑनलाइन समजणार अाहे.

विभागीय ‘सेतू’चा सोमवारपासून प्रारंभ
शुक्रवारी मध्यवर्ती कार्यालयाचा प्रारंभ झाल्यानंतर आता विभागीय सेतू कार्यालयाच्या पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू असून, ते रविवारपर्यंत पूर्ण केले जाणार अाहे. त्यामुळे सोमवार (दि. ४)पासून तेथूनही सेवा सुरू केली जाणार असल्याचे ‘सेतू’च्या संचालकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांना सोमवारपासून वेळेतच दाखले मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वेळेत सेवेसाठी बांधील
^नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी आम्ही बांधील असून, आलेल्या प्रत्येक ग्राहकाचे काम होईपर्यंत, गर्दी संपेपर्यंत आम्ही सेवा देणार आहेत. ठेक्यातच मी २४ तास सेवा देण्याचे अाश्वासित केले आहे. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बसण्याची, तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. -ललित पाटील, संचालक,सेतू

प्रत्येक सेवेसाठी टेबल
दाखले जमा करणे, नोंदणी करणे, रेशनकार्ड, अर्थात, अर्ज स्वीकृती, वितरण, कोरे अर्ज वितरण अशा प्रत्येक सेवेसाठी स्वतंत्र टेबल राहणार आहे.