आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल हजार दाखले धडक मोहिमेत निकाली, महा-इ-सेवा केंद्रातील दाखल्यांवर झाल्या स्वाक्षऱ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सेतूकडून विलंबाने दाखले मिळत असल्याने महा-इ-सेवा केंद्रांना दिलेल्या हजार दाखल्यांसह सेतूच्या दाखल्यांवर धडक स्वाक्षरीची मोहीम राबवत जिल्हा प्रशासनाने प्रलंबित सर्वच दाखले अखेर निकाली काढले. त्यामुळे दाखल्यांची व्याकूळतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता तत्काळ दाखले मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे.
शाळा-महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रियेत सेतूकडून दाखले वितरणास विलंब झाला होता. त्यामुळे विद्यार्थी-पालकांची नाराजी वाढली होती. वारंवार फेरे मारूनही दाखले मिळत नसल्याने अखेर थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी गेल्या होत्या. त्याची दखल घेत थेट सेतू संचालकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. शिवाय, त्याच्याकडील अर्ज महा-इ-सेवा केंद्रांना विभागून देण्यात आले. हजार दाखल्यांपैकी हजार दाखले या केंद्रांना देण्यात आल्यानंतर संबंधित केंद्रांकडून ते लगेचच शुक्रवारीच ऑनलाइन करून स्वाक्षरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे ठेवण्यात आले. त्यावरही प्रशासन उपजिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढत नॉनक्रीमी लेअरच्या दाखल्यांसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना, राष्ट्रीयत्व अधिवासच्या दाखल्यांसाठी तहसीलदार, तर उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी नायब तहसीलदारांना एकाच कक्षात बसवून तातडीने दाखल्यांवर स्वाक्षऱ्या करून घेतल्या. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ स्वाक्षऱ्यांचीच कामे करत विद्यार्थ्यांना दाखले उपलब्ध करून दिले. यातून हजारांवर दाखले स्वाक्षरीसह तयार झाल्याने विद्यार्थ्यांनी लगेचच ते घेऊन जावेत. तर, आता केवळ शनिवार-रविवारी जे दाखले सेतू महा-इ-सेवा केंद्रामध्ये सादर होतील तेवढेच दाखले हे सोमवारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी येणार असल्याने तेही सोमवारी-मंगळवारीच विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दाखल्यांसाठी कुठलीही चिंता करता प्रवेशासाठी दाखल्यांची अडचण येऊ देणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

..तर तत्काळ दाखला
तातडीने दाखला हवा असल्यास थेट प्रशासनाकडेही आपली समस्या व्यक्त केल्यास अपवादात्मक परिस्थितीत तत्काळ दाखलाही देणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...