आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिखल-पाणी, 8 तासांची कहाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सर्वप्रथम अर्ज घेण्यासाठी रांग, अर्ज तपासणीसाठी वेगळी रांग, (तपासणीत काही कागदपत्रांची अपूर्तता असेल किंवा कोणतीही अपूर्तता असेल, तर पुन्हा पूर्तता केल्यानंतर तीच रांग), त्यानंतर पुन्हा अर्ज दाखल करण्यासाठी रांग आणि त्यानंतर 10 ते 12 दिवसांनी पुन्हा दाखला प्रत्यक्ष हातात पडण्यासाठी रांग असा क्लेशदायक प्रवास सहन करावा लागत आहे. कोणत्याही दाखल्यासाठीची प्रक्रिया एका दिवसात पूर्ण होत नसल्याने नागरिकांना किमान तीन दिवस रांगेत उभे रहावे लागत आहे.

पंचवटीतील विभागीय सेतू केंद्रातून दिल्या जाणार्‍या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी नागरिकांना आठ-आठ तास रांगा लावाव्या लागत आहेत. शालेय प्रवेशप्रक्रियांचा हंगाम जोरात असल्याने या सेतू केंद्रात नागरिकांची गत सप्ताहापासून प्रचंड झुंबड उडाली आहे. एकाचवेळी केंद्रावर किमान 700 ते 800 नागरिकांची उपस्थिती प्रत्येक क्षणी असतानाही केंद्रावर केवळ पाच कर्मचारी कार्यरत असल्याने नागरिकांना दाखले मिळण्याच्या प्रक्रियेस प्रचंड विलंब लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

भर पावसात-चिखलात उभे राहण्याची वेळ
पावसात उभे राहण्यासाठी आडोशाच्या अल्पशा जागेशिवाय जागाच नसल्याने नागरिकांना अक्षरश: पावसात आणि चिखलाच्या जागेत उभे राहण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. त्यात प्रत्येक वेळी स्वतंत्र रांग लावावी लागत असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनादेखील प्रचंड वेळ वाया घालवावा लागत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.