आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाडेतत्त्वावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश, शासनाकडून सात कोटींचा निधी मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थासाठी कायमस्वरूपी की भाडेतत्त्वावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे, यावरून सुरू असलेला वाद अखरे मंगळवारी मिटला. शासनाने भाडेतत्त्वावर कॅमेरे बसविण्याचा निर्णय अंतिम केला असून, १० कोटी ४६ लाखांची नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी निधीची तरतूद करत तसा शासन आदेशही काढला आहे.

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असला तरीही राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये नाशिकचे नाव पहिल्या पाच शहरामध्येच येते. त्यामुळे सुरक्षा आणि इतर सर्वच बाबींच्या दृष्टिकोनातून शहरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यावर मुख्यमंत्री आणि पालकमंत्री ठाम होते. परंतु, अधिकाऱ्यांनी एवढ्या कमी वेळेत ते शक्य नसल्याचे सांगत आता भाडेतत्त्वावरच ते बसवावे लागतील, असे स्पष्ट मत व्यक्त केले. त्यावर अखेर अंतिम निर्णय शासनाने घेतला असून, त्यासाठी नाशिकला कोटी ११ लाख रुपयांची तरतूद केली आहे, तर त्र्यंबकेश्वरसाठी कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. शिवाय, पीडब्ल्यूसी या कंपनीची कन्सलटन्ट म्हणून नियुक्ती केली आहे. लागलीच याची निविदा काढण्याची प्रक्रिया करण्याचेही आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार, आता पोलिस विभागाच्या वतीने त्याची निविदा प्रक्रिया त्वरित सुरू केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

सिंहस्थाचे संकेतस्थळ महिनाभरात : यासंकेतस्थळावर जिल्‍ह्यातील धार्मिक, पर्यटन स्थळे, हाॅटेल नाशिक शहराची माहिती देण्यात येणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन आराखडा मंजूर
आपत्तीव्यवस्थापनाच्या १२ कोटी रुपयांच्या आराखड्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी प्रेंझेंटेशन सादर केले. त्यानुसार वाॅटर बोट, लाइफ जॅकेट, इमर्जन्सी लाइट आदी वस्तूंची खरेदी केली जाणार आहे.