आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातशे काेटींची उलाढाल ठप्प; काश्मिरी सफरचंदाला अगाेदर संचारबंदीचा, अाता ‘बंद’चा फटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काश्मीर खाेऱ्यात जवळपास दाेन महिने सुरू असलेली संचारबंदी, टवाळखाेरांच्या दगडफेकीचा विपरीत परिणाम पर्यटनासह देशांतर्गत सफरचंदाच्या व्यापारावरही हाेत अाहे. सध्या काश्मीरमध्ये सफरचंदाचा हंगाम सुरू असून, उत्पादनही मुबलक प्रमाणात असताना अपेक्षित माल देशातील शहरांत पाेहाेचू शकत नसल्याचे समाेर अाले अाहे. यामुळे जवळपास सातशे काेटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली अाहे. संचारबंदी संपल्यानंतर पुकारण्यात अालेल्या संपामुळे गेल्या अाठ दिवसांपासून सफरचंदासाठी प्रसिद्ध असलेल्या साेपाेर मंडीत काेट्यवधींचे सफरचंद पडून अाहेत. संप अाणि दगडफेक करणाऱ्यांच्या उपद्रवामुळे हा माल दिल्लीसारख्या देशाच्या प्रमुख शहरांत पाेहाेचविणे अशक्य हाेत असल्याची माहिती काश्मीर खाेऱ्यातील व्यापाऱ्यांनी िदली. काश्मीर खाेऱ्यात श्रीनगरमध्ये जवळपास दाेन महिन्यांपासून संचारबंदी लागू हाेती. याचा परिणाम तेथील जनजीवनावर झाला असून, येथील पर्यटनासारखा मुख्य व्यवसाय असाे की सफरचंदाची बाजारपेठ प्रचंड प्रभावित झाली अाहे. सध्या काश्मीरमध्ये सफरचंदाचा हंगाम सुरू असून, मुबलक प्रमाणात सफरचंदाचे उत्पादन अाहे, मात्र ही सफरचंद बाजारात अाणण्यासाठी अनंत अडचणी येत अाहेत. उत्तर प्रदेश, बिहारमधील कामगार बागांमध्ये माेठ्या प्रमाणावर काम करीत असतात. ते पुन्हा अापल्या प्रदेशांत परतले असल्याने ताेडणीत अडचणी, तर संचारबंदीमुळे बाजारपेठा बंद अाहेत. जरी सफरचंद घेऊन ट्रक बाजारात पाेहाेचले तरी ते लाेडिंग अनलाेडिंग करणे अशक्य असून, यामुळे दिल्लीमार्गे देशातील सर्वच शहरांत जाणारी सफरचंदाची वाहतूक थंडावली अाहे. यामुळे सफरचंद उत्पादकांसह व्यापाऱ्यांचेही सातशे काेटींचे नुकसान अातापर्यंत झाल्याचा अंदाज काश्मीर खाेऱ्यातील एका नामांकित व्यापाऱ्याने नाव प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

मालमुबलक, पण बाजारातच अडकला :
सफरचंदाकरिताप्रसिद्ध असलेल्या शुफियान, बारामुल्लाचा भाग, अाेरसाेपूर यासारखा दक्षिण काश्मीरच्या भागात यंदा सफरचंदाचे उत्पादन चांगले असून, स्थानिक शेतकऱ्यांना २० रुपये प्रति किलाेपर्यंतचा भाव मिळाला अाहे. झाडावर फळं खराब हाेतात म्हणून बागांतून उतरवून ते सफरचंदाकरिता प्रसिद्ध असलेल्या साेपाेर मंडी (बाजार)पर्यंत पाेहाेचले. यानंतर ते बाॅक्स पॅकिंगही झाले अाणि ट्रक्समध्ये लाेडिंग करून देशांतर्गत बाजारपेठेत पाठवायची वेळ अाली तेव्हा म्हणजे एक अाठवड्यापूर्वी भारतीय सेनेने खबरदारीचा उपाय म्हणून हा बाजार बंद केला. त्यामुळे हा माल येथून पुढे जाऊ शकलेला नाही. तेव्हापासून सफरचंदाची वाहतूक बंद झाली अाहे, अशी माहिती श्रीनगरचे व्यावसायिक समीर आरिफ यांनी दिली.

स्थिती बदलण्याची शक्यता
याचमहिन्यात काश्मीरमधील सफरचंद स्थानिक बाजारात पाेहाेचू शकतील. जर हे प्रमाण मुबलक असले तर मात्र दर कमी हाेऊ शकतील अशी स्थिती असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले.
>सफरचंदातील फरक : सिमला : अाकारमाेठा अाणि कडक असताे. रंग गडद. चवीला थाेडे अांबट. सहा महिन्यांपर्यंत टिकू शकते.
>काश्मिरी सफरचंद : अाकार सिमला सफरचंदापेक्षा छाेटा. रंग गुलाबी. गरेदार अाणि गाेड. दीड महिन्यापर्यंत उत्तम असताे.
बातम्या आणखी आहेत...