आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भपाताच्या औषधांची विक्री करणार्‍या सात औषधविक्रेत्यांचे परवाने रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गर्भपाताच्या औषधांची विक्री करणार्‍या मेडिकल स्टोअर्स आणि त्या गोळ्या घेण्यासाठी रुग्णांना भाग पाडणार्‍या डॉक्टरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेल्या विभागात कारवाईत 23 विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले. त्यात शहरातील सात व्यावसायिक आहेत.
स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून गर्भपाताच्या औषधांचा साठा कोणाकडून खरेदी केला, त्याच्या पावत्या आणि त्या कोणास विकल्या, याच्या तपासणीत नाशिक शहर व जिल्हय़ातील 92 औषधेविक्रेते व 28 घाऊक विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली.
नियमित कारवाई सुरू - आतापर्यंत नाशिक शहरासह विभागातील तिन्ही जिल्ह्यातील 75 औषधेविक्रेत्यांविरोधात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दोषी आढळलेल्या विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई सुरू आहे. सुहास चौधरी, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन