आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात तोळे सोने लांबवले, सिन्नर शहरामध्ये भरदिवसा घडला प्रकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - शहरातील विनयनगरात बुधवारी दुपारी अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटातून सात तोळे सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. प्रदीप केदारनाथ मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन लाख दोन हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची पोलिसांत नोंद करण्यात आली असून, अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी सकाळी 9 वाजता प्रदीप मोरे आणि त्यांच्या पत्नी जयश्री मोरे हे दोघेही घराचे कुलूप लावून नोकरीच्या ठिकाणी गेले होते. जयश्री मोरे या एस.जी. पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका असून, शाळा सुटल्यानंतर 3.30 वाजता घरी परतल्या असता, त्यांना घराच्या दरवाजाचा कोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी दरवाजा ढकलला असता तो आतून बंद असल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे, पाठीमागचा दरवाजा खुला होता. आत प्रवेश केल्यावर अस्ताव्यस्त फेकलेले सामान पाहून त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. कपाटातील तीन तोळ्यांची सोन्याची पोत, एक तोळ्याचा नेकलेस, दोन तोळ्याचा गोफ, पाच ग्रॅमचे मंगळसूत्र, कानातील रिंग, चांदीचे दागिने असा ऐवज चोरीला गेला आहे. यासंदर्भात प्रदीप मोरे यांनी सिन्नर पोलिसांत फिर्याद दिली आहे.