आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकमध्ये मोबाइल डेटा आणि इंटरनेट सेवा बंद;15 दिवसांत आरोपपत्र दाखल करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव-अंजनेरी येथील एका पाच वर्षांच्या बालिकेवर १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकाराने चांगला गोंधळ उडाला आहे. आरोपीवर १५ दिवसांत आरोपपत्र दाखल करणार असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच केसरकर यांनी पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली. दुसरीकडे, प्रशासनाने खबरदारी म्हणून नाशिक शहरासह जिल्ह्यात मोबाइल डेटा आणि इंटरनेट सेवा बंद ठेवली आहे.

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी संशयिताच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली होती. तसेच जाळपोळ, दगडफेक सुरू झाल्याने गावात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले अाहे. दरम्यान, संतप्त नागरिकांनी मुंबई-आग्रा महामार्गाची वाहतुक रोखून धरली असल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र आता परिसरातील तणाव निवळला आहे. रविवारी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आज अनेक शाळांनी सुरक्षेच्या कारणास्तव सुटी जाहीर केली होती.
बलात्कार नव्हे अतिप्रसंगाचा प्रयत्न
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे, की पीडित मुलीवर बलात्कार झालेला नाही. अशा अफवा पसरल्या होत्या. मात्र ही माहिती खरी नाही. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कुणीही अशा स्वरुपाच्या अफवा पसरवू नये. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नका. अशा पोस्ट टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
मुख्यमंत्र्यांचे संयम राखण्याचे अावाहन :
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी तळेगाव फाट्यावर येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. १५ दिवसाच्या अात दोषाराेपपत्र दाखल करण्यात येईल, खटला जलदगती न्यायालयासमाेर चालवण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
संशयित अाराेपीस कठाेर शिक्षा हाेण्यासाठी सरकार कुठलीही कसूर ठेवणार नाही, अशी हमी फडणवीस यांनी अांदाेलनकर्त्यांना दिली व सयंम राखण्याचे अावाहन केले.

पालकमंत्र्यांची भेट

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पीडित कुटुंबाची जिल्हा रुग्णालयात भेट घेतली. तळेगाव येथेही घरी जाऊन कुटूंबीयांची व ग्रामस्थांची भेट घेतली. त्यानंतर पाेलिस अधीक्षक अंकुश शिंदे व अायुक्त रवींद्र सिंघल यांना बंदाेबस्ताबराेबर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे अादेश दिले.
पोलिसांच्या गाड्या फोडल्या, एसटीला लावली आग
लोकांनी ओझरजवळ एका एसटी बसची तोडफोड केली आहे. पोलिसांच्या तीन गाड्याही जाळल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. घोटी, इगतपुरी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ताही बंद करण्यात आला आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला होता, अशी माहिती मिळाली आहे.
मुंबई-आग्रा महामार्ग बंद
आंदोलक नागरिकांनी मुंबई-आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी जाळपोळ केली आहे. तसेच ठिय्या आंदोलन केल्याने वाहतुक खोळंबली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंना लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.
पीडित मुलीवर सव्वातास उपचार नाही
रात्री उशिरापर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. तिकडे पीडित मुलीला जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टर उपस्थित नसल्याने नातेवाईक ग्रामस्थांनी सुमारे पाऊण तास घोषणाबाजी केल्याने तणाव वाढला होता. सव्वाअकराच्या सुमारास डॉक्टर आल्यानंतर पीडित मुलीवर उपचार सुरू झालेे. पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर बातमी... आणि या घटनेनंतर जमावाने केलेल्या जाळपोळीचे फोटो... पोलिसांच्या गाड्याही लोकांनी फोडल्या... अखेरच्या स्लाईडवर बघा व्हिडिओ....