आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरू, साैमित्रने गप्पांतून उलगडला ‘शब्दांच्या अलीकडचा’ प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नटरंगपासून लई भारी चित्रपटापर्यंत अाणि गारवापासून गाेजिरी अल्बमपर्यंतच्या गाण्यांचा उगम कसा झाला, कवितांची गाणी कशी झाली, याचे अापल्या अाेघवत्या शैलीत सादरीकरण प्रसिद्ध कवी तथा गीतकार गुरू ठाकूर अाणि अभिनेता, कवी, गीतकार किशाेर कदम यांनी केले. त्यांच्या कविता, गप्पा अाणि गाण्यांचा दुर्मिळ याेग या ‘शब्दांच्या अलीकडे’ मैफलीतून अाला.
दिशा महिला मंचच्या वतीने काेजागरी पाैर्णिमेच्या पार्श्वभूमीवर गंगापूरराेड येथील शिवसत्य कला - क्रीडा मंडळाच्या मैदानावर या मैफलीचे अायाेजन करण्यात अाले हाेते. गंगापूररोडवासीयांसाठी ही सायंकाळ सौमित्र आणि गुरू ठाकूर यांच्या गप्पा, कविता आणि अधूनमधून पेरलेल्या मराठी चित्रपटगीतांच्या आस्वादातून साजरी झाली. यावेळीचित्रपट क्षेत्रातील या दाेघाही दिग्गजांनी एकमेकांशी गप्पा करत संवेदनेचा एक अनाेखा प्रवास उलगडला.

‘पहाटेसतांबडे फुटावे,
तसे कुणाला शब्द सुचावे’
यासौमित्राच्या ओळींना
‘कधीशब्द आले सुरांनीच
मलाही कळले कसे गीत झाले’ असेप्रत्युत्तर गुरूनी दिले अन त्यानंतर टाळ्यांच्या प्रतिसादातच मैफल उत्तरोत्तर खुलत गेली.

कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका योगिता चितळे अाणि नचिकेत देसाई यांनी तितक्याच ताकदीची स्वरसाथ तर प्रशांत महाले, गौरव तांबे, उमेश खैरनार यांनी संगीत साथ दिली. कार्यक्रमाच्या अायाेजक स्वाती भामरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवयानी फरांदे, सुरेश पाटील, हिमगौरी आहेर-आडके, देवदत्त जोशी, पवन भगूरकर, रोहिणी नायडू आदी उपस्थित हाेते. प्रा. गुलाब भामरे यांनी सूत्रसंचालन केले.

सौमित्र उवाच
{श्रीधर फडके यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती आणि माझिया मना गीतातून ती पूर्ण झाली
{ गाण्याच्या मागे बऱ्याच रंजक गोष्टी असतात, त्या अशा कार्यक्रमातून बाहेर पडतात
{ नाशिकच्या रेडिओवर पावसाची कविता वाचली आणि संध्याकाळी धो धो बरसला

गुरूउवाच
{गाणं सुचनं म्हणजे सेलो टेपचं टोक सापडणं
{ कोकणातील वातावरण बघून मन उधाण वाऱ्याचं गाणं सुचलं
{ ३०-४० प्रेमगीतं लिहिल्यानंतर शब्द अक्षरशः आटून जातात
‘शब्दांच्या अलीकडेे’ कार्यक्रमात गप्पांत रंगलेले किशाेर कदम, गुरू ठाकूर, याेगिता चितळे.
बातम्या आणखी आहेत...