आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shahu Maharaj Jayanti In Nasik Deaf And Dumb Chidren Dance

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘विशेष’ कलाविष्कार; शाहू महाराज जयंतीनिमित्त गतिमंद, मूकबधिर मुलांचे नृत्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - निसर्गाने परिपूर्ण घडविण्यापासून थोडासा अन्याय केल्याने कोणी गतिमंद, कोणी अंध, कोणी मुके, तर कोणी बहिरे. त्यामुळे सर्व विचार, भाव आणि भावना हे केवळ इशारा आणि स्पर्शावर. मात्र, चांगल्या कलावंतालाही तोंडात बोटे घालायला लावेल अशी कला या ‘विशेष’ मुलांनी कला सादर केली, तर ‘ए भाय जरा देख के चलो’ या गीतावर गतिमंद मुलांनी केलेले नृत्य हे तर उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू ढाळणारे होते.

सामाजिक न्याय विभागातर्फे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्यायदिन कालिदास कलामंदिर येथे साजरा करण्यात आला. गुरुवारी सकाळी 7 वाजता हुतात्मा स्मारक येथून रॅली काढण्यात आली होती. रॅली मेहर सिग्नल, शिवाजीरोड, प.सा.नाट्यगृह, शालिमार चौक, बी. डी.हायस्कूलमार्गे कालिदास कलामंदिर येथे समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये मुलांनी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर पथनाट्य सादर केले, तर जिवंत देखावा सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. तसेच कालिदास कलामंदिर येथे बापू सरदेसाई यांचे शाहू महाराजांवरील व्याख्यान सादर झाले. या वेळी जिल्हाधिकारी विलास पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर, उपायुक्त राजेंद्र कलाल, के. एन. गवळे, प्रा. दिलीप धोंडगे, सहायक आयुक्त वंदना कोचुरे, डॉ. स. गो. ओहळ, प्रा. विलास देशमुख यांच्यासह विद्यार्थी, पालक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

पुरस्कारांचे वितरण
कावेरी काळे यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार देण्यात आला, तर दहा विद्यार्थ्यांना शाहू महाराज शिष्यवृत्ती आणि दहा विद्यार्थिंनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.