आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळताना स्वत:ला झोकून द्या - माजी रणजी क्रिकेटपटू शंतनु सुगवेकर यांचा सल्‍ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- प्रामाणिकपणे सराव करा, संघ भावनेने खेळा.. यश नेहमीच तुमच्या पाठीशी राहील. खेळताना स्वत:ला पूर्णपणे झोकून द्या, त्यासाठी सर्वस्व अर्पण करा. आपोआप तुमच्यासारख्या खेळाडूंची नावे जनमाणसावर कोरली जातील, असा सल्ला माजी रणजी क्रिकेटपटू शंतनु सुगवेकर यांनी गुरुवारी विद्यार्थ्यांना दिला.

न्यू आर्टस्, कॉर्मस अँड सायन्स महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे, तर प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार होते. यावेळी सहसचिव अँड. दीपलक्ष्मी म्हसे, अलका जंगले, प्राचार्य डॉ. भास्कर झावरे उपस्थित होते.

या कार्यक्रमात महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, तसेच राज्य पातळीवर गौरवास्पद कामगिरी करणार्‍या खेळाडूंना स्मृतिचिन्ह, ब्लेझर व ट्रॅकसूट देऊन गौरवण्यात आले. सुगवेकर म्हणाले, पुणे विद्यापीठात सर्वाधिक विद्यापीठ खेळाडू म्हणून न्यू आर्टस् महाविद्यालयाचा लौकिक आहे. मुलीही आता क्रीडा क्षेत्रात अग्रेसर आहेत. आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा वराडे व राष्ट्रीय खो-खोपटू श्वेता गवळी या पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र व न्यू आर्टस् महाविद्यालयाची शान आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

स्वागत प्रा. सुधाकर सुंबे यांनी केले. सुगवेकरांचा परिचय अनंत काळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन उद्धव उगले व राजेंद्र जाधव यांनी केले. आभार झिंजुर्डे यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी विद्यापीठ प्रतिनिधी प्राजक्ता पवार, उपप्राचार्य यू. आर. ठुबे, एस. एस. जाधव, एम. व्ही. गिते, दत्ता रिंगे, शारीरिक शिक्षण संचालक शरद मगर, बाळासाहेब कडूस, सुधाकर सुंबे, धन्यकुमार हराळ, धनंजय लाटे यांनी परिश्रम घेतले.