आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौर्‍यांच्या विक्रमात मोदींचे आधुनिक शेतीकडे दुर्लक्ष - शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दहा महिन्यांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात जाण्याचा विक्रम केला. परदेशात जाऊन संबंध वाढवणे गैर नाही. मात्र, विदेशातील शेतीबाबतचे आधुनिक तंत्रज्ञान भारतातही आणण्याची त्यांची भूमिका दिसत नाही. भाजप सरकारच्या प्राधान्यक्रमात शेतीचा संबंधच नाही, अशी टीका टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केली.

नाशिक दौर्‍यावर आलेल्या पवारांनी जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा, डाळिंब व इतर नुकसानग्रस्त पिकांचा पदाधिकार्‍यांकडून आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर तसेच मोदींवर हल्लाबोल केला.

पवार म्हणाले, अवकाळी पाऊस व गारपिटीचे वारंवार संकट येत आहे. अशा परिस्थितीत सरकार म्हणून शेतकर्‍यांना दिलासा देण्याची सरकारची भूमिका नसल्याचे दिसते. मी सांगितल्यानंतर केंद्रीय कृषिमंत्र्यांनी नाशिक दौरा केला. वास्तविक नुकसानीची पाहणी करून मदत जाहीर करण्यासाठी केंद्राची एक समिती आहे. नऊ वर्षे या समितीचे अध्यक्षपद माझ्याकडे होते. आता या समितीचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे असून त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची मध्यंतरी बैठक झाली. मात्र, ठोस नुकसान भरपाई वा मदतीची घोषणाच झाली नसल्याचेही ते म्हणाले.