आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक अफलातून व्यक्तिमत्त्व, नाशिक-मुंबई सहापदरी हायवेला पवारांची पॉवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- देशाच्या राजकारणात गेल्या पाच दशकांपासून दबदबा निर्माण केलेले, पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या शब्दात हवामान खात्याच्या धर्तीवर राजकारणाचा अचूक अंदाज मांडणारे, शेतकऱ्यांची माेट बांधणारे राष्ट्रवादी कॉंरेसचे अध्यक्ष शरद पवार १२ डिसेंबरला अमृतमहाेत्सवी वर्षात पदार्पण करत अाहेत.
नेहमीच राजकीय चर्चेत राहणाऱ्या पवारांचा नाशिकशीही नेहमीच ऋणानुबंध राहिला अाहे. नाशिकच्या द्राक्ष डाळिंबाला प्रतिष्ठा प्राप्त करून देतानाच वाइन कॅपिटलचा दर्जाही त्यांनी मिळवून दिला. जिल्ह्याचा लाैकिक वाढविण्यात पवारांचा माेठा हातभार अाहे. अशा या बहुअायामी व्यक्तिमत्त्वाने नाशिकला नेमके काय दिले, त्यांच्या सहवासात नाशिककरांना काेणते अनुभव अाले, या विषयीच्या अाठवणींना उजाळा देताहेत त्यांचे निकटवर्तीय सहकारी खास ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी!
कुसुमाग्रजांचा शब्द निश्चयाने केला पूर्ण
कवी कुसुमाग्रज यांनी नाट्य परिषदेच्या मालकीचे नाट्यगृह मुंबईत नसल्याची खंत व्यक्त केली. मुंबईचा महापौर म्हणून मी माटुंग्याची जागा दिली. पवारसाहेबांनी तातडीने पाठपुरावा करून नाट्यगृहाची वास्तू उभी करून अार्थिक बळ दिले.
पुढील स्‍लाइडवर वाचा नाशिक-मुंबई सहापदरी हायवेला पवारांची पॉवर
बातम्या आणखी आहेत...