आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार कोणी घोषित केले? - शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘राहुल गांधी हे काँग्रेसच्या पोस्टरवर झळकत असले तरी त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार कुणी घोषित केले?,’ असा प्रश्न शरद पवार यांनी गुरुवारी नाशकातील पत्रकार परिषदेत उपस्थित केला. कॉँग्रेसने तर त्यांची उमेदवारी जाहीर केलेले नसल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

‘राहुल गांधींच्या हाताखाली काम करणार नाही?’ असे आपण कधीच म्हटलो नव्हतो, तर ‘नवीन लोक पुढे येत असतील तर वरिष्ठांनी त्यांना संधी द्यायला हवी,’ अशी भूमिका मांडली असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. ‘अनेक वर्षे मंत्री असूनही गावितांनी पक्षाशी प्रतारणा केली. पक्षाची शिस्त मोडल्याने त्यांनाही आम्ही हाकलले, तर अन्य छोट्या-मोठय़ा कार्यकर्त्यांचे काय विचारता?,’ असेही ते म्हणाले.