आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदत परत मागणार्‍या मोदींना सत्ता देणार का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गुजरातमध्ये भूकंप झाल्यानंतर सर्वाधिक मदत महाराष्ट्राने दिली. मात्र, गेल्या वर्षी आपल्या राज्यात दुष्काळग्रस्तांना पशुखाद्य स्वरूपात दिलेल्या मदतीचा मोबदला घेण्यासाठी गुजरातकडून खटपट सुरू आहे. आपल्याकडे चारा छावणी उभारणार्‍या गुजरातेतील संस्थांवर गुन्हे दाखल करण्याचे इशारेही त्यांनी दिले आहेत. अशा नेत्याच्या हातात तुम्ही सत्ता सोपवणार का? असा सवाल केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केला.

दिंडोरीतील राष्ट्रवादीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ वणी येथील सभेत ते बोलत होते. गुजरातमध्ये पशुखाद्य पुरवणार्‍या कंपन्यांनी दुष्काळी भागात फुकट चारा पुरवठा केला, मात्र आता या संस्थांकडे पशुखाद्याचा हिशेब विचारून, गुन्हे दाखल करण्याचा इशारा गुजरात सरकार देत आहे. दुष्काळग्रस्तांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याचे पवार म्हणाले.

भुजबळ पुण्याचे पालकमंत्री असते....
छगन भुजबळ यांना दिल्लीत पाठवून लोकसभेतील राष्ट्रवादीचे गटनेते केले जाणार आहे. भुजबळ यांनी नाशिकचा चौफेर विकास केला. तितका विकास पुण्यातही झाला नसल्याचे सांगत त्यांना पुण्याचे पालकमंत्री असते तर बरे झाले असते अशी मिश्कीलीही पवार यांनी केली. नाशिक व पुणे आपल्यासाठी वेगळे नसून जितके पुण्याने दिले नाही तितके पुलोदच्या काळात सर्व आमदार निवडून नाशिकने दिले हे मी कधीही विसरणार नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले....
कांद्याचे भाव वाढले तर पवारांनाच जबाबदार धरले जाते. मात्र त्यात शेतकर्‍यांचा फायदा असतो. त्यामुळे कोणी कितीही काही बोलले तरी मी शेतकर्‍यांचीच बाजू घेईल असे संसदेत निक्षून सांगितले.

शेतकर्‍यांना 4 टक्के व्याजदराने कर्ज दिल्यावर काहींनी राष्ट्रीयकृत बॅँकेत 10 टक्के व्याजाने हेच पैसे ठेवले. मधल्यामध्ये 6 टक्के व्याजाचे पैसे ते कमवत असल्याचे लक्षात आले. यातून शेतकरी हुशार होत असल्याची बाब लक्षात आली.

कॉँग्रेसमुक्त भारताचा नारा देणार्‍यांना देशाला स्वातंत्रता मिळवून देण्यासाठी कोणी रक्त सांडवले याचा सोयीस्कर विसर पडला.महिला आरक्षण देवून महिलांना सक्षम कॉँग्रेस आघाडीनेच केले. डॉ भारती पवार यांच्यारूपात पुन्हा एक चेहरा देण्यात आला.