आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांनाे, आत्महत्या करून कुटुंबाला रस्त्यावर आणू नका; शरद पवारांचे अावाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘शासनाने  अद्याप कर्जमाफीचे लाभ दिलेले नाहीत. दहा हजारांचे अनुदानही मिळाले नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली असली तरीही  शेतकऱ्यांनाे, अात्महत्या करून आपल्या बायकाे-पाेरांना रस्त्यावर आणू नका. जिद्दीने लढण्याची ऊर्जा कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्ये निर्माण करत एकत्र या. आपल्या भावांनाही बळ द्या. आपली सामुदायिक ताकद या राज्यकर्त्यांना दाखवा,’ असे आवाहन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी साेमवारी केले. 

किसान मंचच्या वतीने ५५ दिवसीय ‘शेतकरी शेतमजूर सुरक्षा अभियान’चा समारोप नाशिक येथे सोमवारी झाला. यावेळी आयोजित राज्यस्तरीय शेतकरी प्रतिनिधी अधिवेशनात ते बाेलत हाेते. पवार म्हणाले, ‘तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे अाश्वासन हे सरकार देत आहे. २०१६ साल गेले. आता २०१७ वर्षही संपत आहे. असे असतानाही या सरकारला शेतकऱ्यांची कुठलीही चिंता नाही. घसरणाऱ्या शेतीमालाच्या किमतीबाबतही कुठलेही देणे-घेणे नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे, मी कृषिमंत्री असताना कांद्याच्या वाढलेल्या किमतीविरोधात भाजपचे खासदार सभागृहात कांद्याचा माळा घालून मला जाब विचारण्यास आले. त्यावेळी मी शेतकऱ्याला दोन पैसे मिळत असतील तर तुमचे काय बिघडले? असे सांगत त्यांची मागणी फेटाळून लावली होती. २० टक्के शेतकरी आणि ८० टक्के ग्राहकांचे ते भांडवल करत होते. पण, माझी भूमिका स्पष्ट होती. २० टक्के शेतकरी असला तरीही तो उद्धस्त झाल्यास देश उद्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे मी तेव्हा ठासून सांगितले होते. आता शेतीमालाला भाव मिळत नसल्यानेच तो कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे.  शेतीमालाच्या किमतींबाबत खेळ करणे देशाला परवडणारे नाही. आमचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्राहकधार्जिणेच आहे. नोटाबंदीनेही देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होणार असल्याचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले होते अन् तसेच होत असल्याचे ते म्हणाले.
 
तेल किमतीतून लूट
अांतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर झपाट्याने कमी झाले आहेत. पण, आपल्या देशात कधी नव्हत्या अशा विक्रमी उच्चांकावर पेट्रोल, डिझेल, गॅस आणि रॉकेलच्या किमती वाढवत भाजप सरकार जनतेची लूट करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. तेलदरवाढीमुळे सर्वच बाबींचे दर वाढत आहेत. महागाई वाढत आहे. आधीच नोटाबंदीने हतबल झालेल्या समाजातील प्रत्येक घटक महागाईत अजूनच बुडाला आहे. कोणीही समाधानी नसल्याचेही पवार म्हणाले.
 
काळ्या पैशाची नोटाबंदीपूर्वी विल्हेवाट 
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी अचानकपणे निर्णय घेतला असे दाखविले जात असले, तरीही ८६ हजार कोटींच्या नोटा जशाच्या तशा परत आल्या. त्यामुळे काळा पैसा कुठे निघाला. म्हणजे ज्यांच्याकडे हा पैसा होता, त्यांचे सरकारमधील लोकांशी लागेबांधे असल्याने त्यांनी निर्णयापूर्वीच त्याची विल्हेवाट लावल्याचाही आरोप पवारांनी केला.  
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 
 
बातम्या आणखी आहेत...