आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारचा निर्णय चुकीचा, टोलमुक्तीने विकास खुंटेल : शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - फडणवीस सरकारने सवंग लाेकप्रियतेसाठी टोलमुक्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे चांगल्या वाहनांचे नुकसान हाेईल, खराब रस्त्यांमुळे इंधन जास्त लागेल व विकास खुंटेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

राज्यात १२ टोलनाके कायमचे बंद करण्याच्या सरकारच्या घोषणेबाबत पवार म्हणाले, रस्त्यांमुळेच विकास होतो, हे परदेश व गुजरातच्या उदाहरणांवरून दिसते. गुजरातेत टोलच्या निधीतूनच रस्ते बांधकाम होत आहे. त्यामुळे तेथे औद्योगिक व पर्यायाने सर्वांगीण विकास झाल्याचे दिसते. टोलमुक्ती हवी असेल तर चांगले रस्ते बांधणे व दर्जा टिकवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पुरेसा निधी द्यावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.